Lokmat Sakhi >Beauty > केस दाट-लांबसडक का होत नाहीत? पाहा, तुम्ही काय काय खात नाही, उपाय एकदम सोपा

केस दाट-लांबसडक का होत नाहीत? पाहा, तुम्ही काय काय खात नाही, उपाय एकदम सोपा

3 Super foods for long and healthy hair : महिनाभर आहारात ३ घटक घेतल्यास होईल केसांची उत्तम वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2024 05:36 PM2024-01-08T17:36:47+5:302024-01-09T15:33:51+5:30

3 Super foods for long and healthy hair : महिनाभर आहारात ३ घटक घेतल्यास होईल केसांची उत्तम वाढ

3 Super foods for long and healthy hair : To make hair thick and long, take 3 ingredients in your diet without fail, you will look beautiful... | केस दाट-लांबसडक का होत नाहीत? पाहा, तुम्ही काय काय खात नाही, उपाय एकदम सोपा

केस दाट-लांबसडक का होत नाहीत? पाहा, तुम्ही काय काय खात नाही, उपाय एकदम सोपा

केस लांबसडक होण्यासाठी त्यांची बाह्य काळजी जितकी महत्त्वाची असते तितकीच शरीरातूनही केसांचे पोषण होणे आवश्यक असते. केसांची वाढ व्हावी आणि ते छान सिल्की दिसावेत यासाठी आपण त्याला चांगले तेल लावणे, एखादा हेअर मास्क लावणे, वेळच्या वेळी ते धुणे, आवश्यकता वाटल्यास हेअर स्पा असे सगळे करतो. पण यासोबतच केसांची मुळे मजबूत असतील तर नकळत केसही छान होण्यास मदत होते. केसांना आपण खात असलेल्या अन्नातून पोषण मिळत असून हा आहार पोषक आणि उत्तम असायला हवा. शरीराचे ज्याप्रमाणे आहारातून पोषण होते त्याचप्रमाणे केसांचेही अन्नघटकांतून पोषण होत असते. या घटकांमुळे केस लांब, दाट आणि सिल्की होण्यास मदत होते. म्हणूनच आहारात कोणत्या ३ घटकांचा समावेश करायला हवा पाहूया (3 Super foods for long and healthy hair)...

१. झिंक 

केवळ प्रदूषण किंवा इतर गोष्टींमुळेच नाही तर ताण आणि हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळेही केस  गळण्याचे प्रमाण वाढते. पण आहारात झिंकचा योग्य प्रकारे समावेश केल्यास केस वाढण्यास आणि केस गळणे कमी होण्यास मदत होते. यासाठी आहारात बिन्स, छोले, चिया सीडस आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करायला हवा. 

(Image : Google)
(Image : Google)

२. बायोटीन 

बायोटीन हा केसांसाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. केरोटीन हा केसांसाठी आवश्यक असणारा घटक असून बायोटीनचे प्रमाण चांगले असेल तर केरोटीन वाढण्यास मदत होते. केसांची मुळे मजबूत होण्यासाठी हे केराटीन आवश्यक असते. डोक्यातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही याची चांगली मदत होते. यासाठी आहारात दूध, केळी, आक्रोड यांचा समावेश वाढवायला हवा. 

३. आवळा

आवळा या फळाला आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व असल्याचे आपल्याला माहित आहे. व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत असलेला आवळा आरोग्याच्या विविध तक्रारींवर गुणकारी असतो. त्याचप्रमाणे तो त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतो. केस चमकदार होण्यासाठी तसेच दाट आणि लांब होण्यासाठी आवळ्याचा फायदा होतो. आवळ्याचे तेल, हेअर मास्क यासोबतच सकाळी रिकाम्या
 पोटी आवळ्याचा ज्यूस पिणे उपयुक्त ठरते. 
 

Web Title: 3 Super foods for long and healthy hair : To make hair thick and long, take 3 ingredients in your diet without fail, you will look beautiful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.