Join us  

ऐन तारुण्यात का वाढते ॲक्ने- पिंपल्सची समस्या? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि ३ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 1:11 PM

Home Remedies For Reducing Acne And Pimples: मुलं- मुली वयात आली की त्यांच्या चेहऱ्यावर ॲक्ने- पिंपल्स यायला सुरुवात होते. तुम्हीही या समस्येने हैराण असाल, तर हे काही उपाय करून बघा..

ठळक मुद्देहा त्रास कमी करण्यासाठी आहारात बदल कसे करावेत किंवा कोणते नैसर्गिक उपचार करावेत, याविषयी......

चेहऱ्यावर ॲक्ने- पिंपल्स येणं ही अनेक मुला- मुलींसाठी सध्या डोकेदुखी ठरते आहे. कारण त्यांच्यावर कितीही उपचार केले किंवा वेगवेगळे क्रिम लावले, फेसपॅक वापरले तरी ॲक्ने- पिंपल्स (3 things to reduce Teenage acne) यांचं प्रमाण काही कमी होत नाही आणि चेहरा काही स्वच्छ- सुंदर दिसत नाही. उलट बऱ्याचदा तर वेगवेगळे क्रिम किंवा कॉस्मेटिक्स वापरल्यामुळे ही समस्या जास्तच वाढली असल्याचाही अनेकांचा अनुभव आहे. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी आहारात बदल कसे करावेत किंवा कोणते नैसर्गिक उपचार (How to get rid of acne and pimples?) करावेत, याविषयी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. 

 

टीनएजमध्ये ॲक्ने- पिंपल्स येण्याची कारणंसाधारण ११- १२ व्या वर्षी मुले- मुली वयात यायला सुरुवात होते. या काळात त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर जाणवते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे त्वचेखाली असणाऱ्या तैलग्रंथी अधिक जास्त प्रमाणात सेबम निर्माण करतात. त्यामुळे सेबमनचे प्रमाण वाढले की चेहऱ्यावर पिंपल्स- ॲक्ने येण्यास सुरुवात होते. आहारात काही बदल केले तर नक्कीच हा त्रास कमी होऊ शकतो.

 

ॲक्ने- पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी उपाय१. रात्रीची पुरेशी झोपबहुतांश टीनएजर्सला असणारी एक सवय म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी मोबाईल बघत बसणे. मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप अशी कोणतीही स्क्रिन तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी बघत असाल तर त्यामुळे झोप लवकर लागत नाही.

वजन कमी करण्याचा खास फॉर्म्युला... १५ दिवसांत जाणवेल फरक, बघा नेमकं काय करायचं

शांत झोप होत नाही. यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडत जाते. म्हणून रात्रीचा स्क्रिनटाईम कमी करा आणि लवकर झोपा. 

 

२. रोजचा व्यायामनेमका याचाच अनेक जणांना कंटाळा असतो. पण शरीरातून टॉक्झिन्स बाहेर पडण्यासाठी दररोज ६० ते ९० मिनिटांचा व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळा. योगा, स्केटिंग, ट्रेकिंग असेही करू शकता.

महागामोलाची पैठणी कायम नवीकोरी दिसायची तर करा फक्त ६ गोष्टी, पैठणी कायम राहील नव्यासारखी

३. आहारात बदलत्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आणि ई यांची खूप गरज असते. यासाठी अक्रोड, भोपळा, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, तूप, लोणी, कंद प्रकारातल्या भाज्या नियमित खाव्या. तसेच चिप्स, कोल्ड्रिंक, बिस्किटे, एनर्जी ड्रिंक घेणे टाळा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीअन्नहोम रेमेडी