Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

3 Tips for Preventing Dry Skin in Winters : Are You Making These 3 Winter Skincare Mistakes : How to prevent dry skin in winter naturally : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना आपण नेमक्या कोणत्या लहान - सहान चुका करतो, ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 06:55 PM2024-11-14T18:55:11+5:302024-11-14T19:01:20+5:30

3 Tips for Preventing Dry Skin in Winters : Are You Making These 3 Winter Skincare Mistakes : How to prevent dry skin in winter naturally : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना आपण नेमक्या कोणत्या लहान - सहान चुका करतो, ते पाहूयात.

3 Tips for Preventing Dry Skin in Winters Are You Making These 3 Winter Skincare Mistakes How to prevent dry skin in winter naturally | हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

नुकतेच थंडीचे दिवस सुरु आले आहेत. अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला लागली आहे. जसजसा वातावरणातील गारठा वाढतो त्याचा परिणाम आपले आरोग्य आणि त्वचेवर अगदी पटकन दिसून येतो. प्रत्येक ऋतूंमध्ये आपल्याला त्वचेची काळजी घ्यावीच लागते परंतु हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात जर त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्वचेवर सुरकुत्या येतात. एवढंच नव्हे तर त्वचेला भेगा पडून त्वचा वारंवार कोरडी पडू लागते(3 Tips for Preventing Dry Skin in Winters).

हिवाळ्यात त्वचा सारखी कोरडी पडून रुक्ष, निस्तेज, काळवंडलेली दिसू लागते. हिवाळ्यात वातावरणातील गारव्याने आपल्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषला जातो. यासाठीच हिवाळ्यात आपण त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी विंटर लोशन, क्रिम, मॉइश्चरायझर लावतो. परंतु काहीवेळा मॉइश्चरायझर, लोशन, क्रिम लावून देखील आपली त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यात (How to prevent dry skin in winter naturally) त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेऊन देखील काहीवेळा आपली त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना आपण काही छोट्या चुका करतो, या चुकांमुळेच आपली त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते. आपल्या डेली रुटीनमध्ये आपण अशा नेमक्या कोणत्या चुका करतो ज्यामुळे त्वचेची काळजी घेऊन देखील त्वचा कोरडी पडते, ते पाहूयात(Are You Making These 3 Winter Skincare Mistakes).

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून या चुका टाळा...     

चूक १ :- खूप गरम किंवा थंड पाण्याचा त्वचेसाठी वापर करणे. 

हिवाळ्यात खूप थंडी लागते म्हणून आपण शक्यतो गरम पाण्यानेच आंघोळ करतो. परंतु थंडीत गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर केल्याने त्वचेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते, परिणामी त्वचा आपला नैसर्गिक ओलावा गमावते. खूप गरम पाण्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल देखील नष्ट होते आणि त्वचा अधिक कोरडी दिसू लागते. याचबरोबर, थंड पाण्याचा वापर केल्याने त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या पडून त्वचा अधिकच रुक्ष दिसू लागते. यासाठी थंडीत खूप गरम किंवा थंड पाणी न वापरता नॉर्मल म्हणजेच साध्या पाण्याचा वापर करावा. 

मीरा राजपूत सांगतेय, हळद - बेसनाच्या स्क्रबचे सिक्रेट! कडाक्याच्या थंडीतही दिसेल तिच्या चेहऱ्यावर असते तशी चमक

चूक २ :- हिवाळ्यात त्वचेला स्क्रबिंग करणे. 

हिवाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे त्वचा आधीच कोरडी, रुक्ष होते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि छिद्रे स्वच्छ करण्यासाठी जर आपण त्वचेला स्क्रबिंग केले तर त्वचा आणखी कोरडी होते. यासाठी शक्यतो हिवाळयात स्किन केअर रुटीन फॉलो करताना स्क्रबिंग करणे टाळावे. थंडीत त्वचेची काळजी घेताना फेस स्क्रब न करता त्वचेचीसाठी फेस मास्कचा वापर करावा. हिवाळ्यात स्क्रबिंग करू नका स्क्रबिंग केल्याने त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे काम होते, परंतु जर ते जास्त केले गेले तर त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात स्क्रबिंग करु नका. 

हिवाळ्यात हातापायांवर सुरकुत्या, त्वचा रखरखीत दिसते? करा हळदीचा १ घरगुती उपाय, थंडीत त्वचा होईल मुलायम

चूक ३ :- स्किन स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करणे. 

साबणाचा वापर कमी करा हिवाळ्यात साबणाने आंघोळ केली तर त्वचा कोरडी पडते. साबण त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकते आणि त्यामुळे त्वचा मोठ्या प्रमाणात कोरडी होते. इतकेच नाही तर अनेक साबणांमध्ये खूप जास्त pH असते ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे त्वचेवर खाज आणि कोरडेपणा वाढतो. जर तुम्ही साबण लावत असालच तर त्वचेवर लोशन किंवा बॉडी ऑइल लावणे गरजेचे आहे.

Web Title: 3 Tips for Preventing Dry Skin in Winters Are You Making These 3 Winter Skincare Mistakes How to prevent dry skin in winter naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.