मेकअप करणे ही गोष्ट कोणत्याही वयोगटांतील स्त्रीची आवडती गोष्ट आहे. मेकअप करुन सुंदर दिसणे हे प्रत्येकीलाच पसंत असते. मेकअप केल्याने आपल्या सौंदर्यात अधिक भर तर पडतेच, पण त्याचबरोबर स्त्रीचा आत्मसविश्वास देखील वाढतो. परंतु हा मेकअप योग्य प्रमाणांत चेहऱ्यावर सेट झाला तरच तो चेहऱ्याचे सौंदर्य खुलवतो. याउलट, चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणारा मेकअपचं चेहरा विद्रुप करु शकतो. आपण लग्न समारंभ, पार्ट्या, छोटेखानी फंक्शन असले की नक्की मेकअप करतो. मेकअप केल्यानंतरही काहीवेळा काही छोट्या समस्या उद्भवू शकतात. या छोट्या छोट्या समस्यांमुळे मेकअप बिघडून आपला चेहरा व लूक खराब दिसू शकतो.
काहीवेळा आपल्या चेहऱ्यावर हसल्यामुळे पडणाऱ्या स्माईल लाईन्समुळेदेखील आपला मेकअप खराब होऊ शकतो. स्माईल लाईन्समुळे, चेहेऱ्यावरील मेकपला छोटे छोटे तडे जाऊन ऐनवेळी मेकअप फुटू शकतो. हसल्यामुळे चेहऱ्यावर स्माईल लाईन्स येणं नैसर्गिक आहे. नैसर्गिकरित्या आलेल्या या स्माईल लाईन्सनां आपण चेहेऱ्यावरून हटवू तर शकत नाही. परंतु काही सोप्या टिप्स वापरुन आपण स्माईल लाईन्समुळे, बिघडणारा मेकअप लूक नक्कीच सुधारु शकतो. स्माईल लाईन्समुळे मेकअप बिघडून लूक खराब होऊ नये म्हणून या ३ टिप्सचा वापर करु(3 Tips To Stop Makeup From Creasing In Smile Lines).
नक्की कोणत्या आहेत ३ मुख्य टिप्स...
१. मेकअपला चेहेऱ्यावर सेट करणे महत्वाचे :- मेकअप करताना आपण चेहेऱ्यावर बऱ्याचदा क्रिम बेस्ड प्रॉडक्ट्सचा वापर करतो. आपण वापरत असलेले फाऊंडेशन, कंसिलर हे थोडे घट्ट क्रिम बेस्ड स्वरूपाचे असते. हे प्रॉडक्ट्स घट्ट क्रिम बेस्ड स्वरूपाचे असल्याकारणाने काही कालांतराने, आपल्या स्माईल लाईनमुळे ते चेहेऱ्यावर एकाच ठिकाणी एकत्रित जमा होऊन त्याचे गट्ठे तयार होतात. अश्या परिस्थिती आपण हसल्यावर आपल्या स्माईल लाईनमुळे चेहऱ्यावर एकत्रित जमा झालेला मेकअप हायलाईट होतो. असा मेकअप दिसताना खूप पॅची किंवा खराब दिसतो. हे टाळण्यासाठी, चेहेऱ्यावर घट्ट क्रिम बेस्ड प्रॉडक्ट्स लावल्यानंतर मेकअप लूज पावडरच्या मदतीने क्रिम बेस्ड प्रॉडक्ट्स व्यवस्थित सेट करुन घ्यावे. याचबरोबर, मेकअप करुन झाल्यानंतर तो व्यवस्थित सेट करण्यासाठी सर्वात शेवटी मेकअप सेटिंग स्प्रेचा देखील अवश्य वापर करावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील स्माईल लाईनमुळे मेकअप न बिघडता जसा आहे तसाच्या तसाच राहील.
२. मेकअपची लेअर पातळ करावी :- मेकअप करताना वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सचा चेहेऱ्यावर जाड थर न करता, एकदम पातळ थर करावा. मेकअप करताना ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मेकअप करताना वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सचा चेहेऱ्यावर एकावर एक थर लावला जाईल अशा पद्धतीने मेकअप करु नका. जर मेकअपचा एकावर एक थर लावला गेला तर, प्रॉडक्ट्स चेहेऱ्यावर व्यवस्थित सेट होणार नाहीत. यामुळे आपण हसल्यावर चेहऱ्याच्या स्माईल लाईनमध्ये अडकलेला मेकअप स्पष्ट दिसून, त्यामुळे आपला मेकअप खराब होऊन लूक बिघडण्याची शक्यता असते.
३. मेकअप ब्लेंडीग वर लक्ष ठेवा :- बहुतेकवेळा घाई गडबडीत आपण मेकअप तर करतो. परंतु केलेला मेकअप ब्लेंड करायला विसरतो. मेकअप चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड न झालयामुळे क्रिम बेस्ड प्रॉडक्ट्स चेहेऱ्यावर सेट होत नाहीत. यामुळे चेहरा सुंदर दिसण्याऐवजी मेकअप खराब होऊन विद्रुपच दिसतो. चेहऱ्यावर लावलेले क्रिम बेस्ड प्रॉडक्ट्स व्यवस्थित ब्लेंड होण्यासाठी ब्यूटी ब्लेंडरचा वापर करावा. ब्यूटी ब्लेंडरचा वापर करण्याआधी, ते थोडे पाण्यात भिजवून घ्यावे. थोड्याश्या ओल्या केलेल्या ब्यूटी ब्लेंडरचा वापर करुन मेकअप चेहऱ्यावर सर्वप्रथम व्यवस्थित डॅब करून घ्यावा.