Lokmat Sakhi >Beauty > १ तुरटीचा खडा चेहऱ्यावर आणतो तेज, ३ फेसपॅक स्वस्तात मस्त सोपा उपाय...

१ तुरटीचा खडा चेहऱ्यावर आणतो तेज, ३ फेसपॅक स्वस्तात मस्त सोपा उपाय...

Here are 3 ways in which you can use alum for skin care : तुरटी फक्त पाणीच स्वच्छ करत नाही तर त्वचेसाठीही अत्यंत उपयोगी आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 05:12 PM2023-08-31T17:12:17+5:302023-08-31T17:38:35+5:30

Here are 3 ways in which you can use alum for skin care : तुरटी फक्त पाणीच स्वच्छ करत नाही तर त्वचेसाठीही अत्यंत उपयोगी आहे...

3 TOP WAYS TO USE ALUM POWDER (FITKARI) FOR LIGHTENING DARK SPOTS & ACNE SCARS. | १ तुरटीचा खडा चेहऱ्यावर आणतो तेज, ३ फेसपॅक स्वस्तात मस्त सोपा उपाय...

१ तुरटीचा खडा चेहऱ्यावर आणतो तेज, ३ फेसपॅक स्वस्तात मस्त सोपा उपाय...

तुरटी, जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात असतेच. रोजच्या अनेक छोट्या - मोठ्या कामांमध्ये तुरटीचा वापर केला जातो. याच तुरटीचा वापर करून आपण आपलं सौंदर्य वाढवू शकता. दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी असते. यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. जुन्या काळात सौंदर्यांसाठी तुरटीचा वापर केला जायचा. तुरटीचा वापर करून चेहरा आणि केस या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात. 

पावसाळ्यात गढूळ झालेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी पाण्यात फिरविली जाते. परंतु याशिवाय तुरटीचे अनेक उपयोग आहेत. तुरटीचा वापर त्वचेसाठी अनेक प्रकारे करता येतो. बदलत्या ऋतुसोबत त्वचेची समस्या (Skin Problem) अनेकांसाठी त्रासदायक ठरते. वेगवेगळ्या कारणांमुळे बहुतेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांनी हैराण आहेत. आपली त्वचा मुलायम, स्वच्छ आणि नितळ दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काहीजण महागड्या ट्रिटमेंट्स व इतर स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या या औषधी आणि सौंदर्य उत्पादनांचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण काही घरगुती उपाय (Home Remedy) करून त्वचा निरोगी आणि चांगली ठेवू शकतो. तसेच हे घरगुती उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य अगदी कमी किमतीत आणि सहज उपलब्ध होते. त्वचेच्या आरोग्यासाठी तुरटीचा वापर नेमका (How to use the alum stone in your skincare) कसा करावा ते जाणून घेऊयात(3 TOP WAYS TO USE ALUM POWDER (FITKARI) FOR LIGHTENING DARK SPOTS & ACNE SCARS).

त्वचेसाठी कोणत्या ३ पद्धतीने तुरटीचा वापर करता येईल ? 

१. तुरटी व गुलाब पाणी :- चेहऱ्याचा हरवलेला ग्लो, रंग व चमकदारपणा परत आणण्यासाठी तुरटी हा एक चांगला पर्याय आहे. तुरटी व गुलाब पाण्याचा फेस मास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी तुरटीची बारीक पूड करुन घ्यावी. आता एक चमचा तुरटी पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर, तयार केलेली पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. आता सर्कुलेशन मोशनमध्ये हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. किमान १५ मिनिटे मसाज  केल्यानंतर, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर त्वचेला मॉइश्चरायजर लावून घ्यावे. असे केल्याने चेहऱ्याच्या समस्या कमी होतील. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोनदा लावू शकता.

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

२. तुरटी व ग्लिसरीन :- चेहरा चमकदार करण्यासाठी आपण तुरटीसोबत ग्लिसरीनचाही वापर करू शकता. तुरटी व ग्लिसरीनचे टोनर बनवण्यासाठी पॅनमध्ये पाणी गरम करा. आता त्यात तुरटीची पावडर आणि काही तुळशीची पाने घाला. पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यावर एका  स्प्रे बाटलीत भरून ठेवा. आता त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाका आणि मिक्स करा. आता आपण हे टोनर चेहऱ्यावर वापरू शकता. असे केल्याने त्वचेला आलेला लुजपणा नाहीसा होऊन घट्टपणा येतो आणि चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. हे टोनर आपण दिवसातून १ ते २ वेळा चेहऱ्यावर लावू शकता.

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

३. तुरटी व मुलतानी माती :- त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण तुरटी आणि मुलतानी मातीची पेस्टही लावू शकता. हा फेसपॅक तयार करण्यासाठी, तुरटी पावडर घेऊन त्यामध्ये मुलतानी माती, गुलाब पाणी किंवा कोरफड जेल मिसळा. हे सर्व मिसळून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून आपण हलक्या हातांनी स्क्रब करून घ्यावे. साधारण २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांचे डागही दूर होण्यास मदत होते. याशिवाय ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने जळजळ आणि लालसरपणा यापासून आराम मिळतो.

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस..

Web Title: 3 TOP WAYS TO USE ALUM POWDER (FITKARI) FOR LIGHTENING DARK SPOTS & ACNE SCARS.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.