Lokmat Sakhi >Beauty > मेथीच्या दाण्यांचे ३ सोपे उपाय, केसांच्या सर्व समस्यांवर एकच असरदार - गुणकारी इलाज...

मेथीच्या दाण्यांचे ३ सोपे उपाय, केसांच्या सर्व समस्यांवर एकच असरदार - गुणकारी इलाज...

Amazing benefits of fenugreek seeds for hair : केस जाड आणि मजबूत कोणाला नको? यासाठी मेथी दाणे ठरतील उपयुक्त, पाहा वापरण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 06:24 PM2023-11-02T18:24:16+5:302023-11-02T18:55:58+5:30

Amazing benefits of fenugreek seeds for hair : केस जाड आणि मजबूत कोणाला नको? यासाठी मेथी दाणे ठरतील उपयुक्त, पाहा वापरण्याची योग्य पद्धत...

3 Ways Fenugreek Methi Seeds Benefits Your Hair Health, truggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek Methi Seeds May Help | मेथीच्या दाण्यांचे ३ सोपे उपाय, केसांच्या सर्व समस्यांवर एकच असरदार - गुणकारी इलाज...

मेथीच्या दाण्यांचे ३ सोपे उपाय, केसांच्या सर्व समस्यांवर एकच असरदार - गुणकारी इलाज...

सध्याच्या काळात स्ट्रेस, बदलती लाइफस्टाईल, प्रदूषण यांसारख्या अनेक समस्यांमुळे केसगळतीची समस्या अनेकांना सतावत आहे. केस गळणे, केसांत कोंडा होणे, केस अकाली पिकणे, टक्कल पडणे यांसारख्या अनेक समस्या त्रास देतात. या केसांच्या अनेक समस्यांवर आपण अनेक उपाय करुन पाहतो. वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेलं, कंडिशनर असे नानाविविध उपाय करुन पाहतो. परंतु या उपायांचा केसांच्या समस्यांवर काही अंशी फरक पडतो, परंतु समस्या संपूर्णपणे नाहीशी होत नाही. अशावेळी काही घरगुती जुने उपचार किंवा आजीच्या बटव्यातील खास उपाय करुन पाहिले जातात(How to apply methi on hair for hair growth).

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी दाणे (Fenugreek Treatment to Boost Hair Growth) हे वरदान ठरतात. मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन - सी हे स्कॅल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यास मदत करतात. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात. केसांच्या अनेक समस्या असतील तर मेथीचे दाणे (Struggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek Methi Seeds May Help) हमखास वापरण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात मेथीच्या दाणांना खूप मोठे महत्त्व आहे. या बियांमुळे (Fenugreek Benefits For The Hair) केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. या मेथी दाण्याच्या (Methi Dana for Hair) वापरामुळे केसांचे बिघडलेले आरोग्य व हरवलेले सौंदर्य आपण पुन्हा आणू शकतो. आपल्याला फक्त ते कसे वापरायचे हे माहित असणे आवश्यक आहे ? केसांसाठी मेथी दाणे योग्य पद्धतीने वापरल्यास केसांच्या अनेक समस्या या कायमच्या दूर होऊ शकतात(3 Ways Fenugreek Methi Seeds Benefits Your Hair Health).

केसांसाठी मेथीचे दाणे वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती कोणत्या ? 

१. मेथी दाण्यांची पेस्ट :- केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण मेथी दाण्यांची पेस्ट केसांना लावू शकता. मेथी दाण्यांची पेस्ट बनवण्यासाठी २ ते ३ टेबलस्पून मेथी दाणे घेऊन ते रात्रभर पाण्यांत भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी मेथी दाणे भिजवलेले पाणी व दाणे यांना एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्यांची पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट थेट स्कॅल्प आणि केसांच्या मुळांशी चोळून लावून घ्यावी. ही मेथी पेस्ट केसांवर तशीच २० मिनिटे राहू द्यावी त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केस घनदाट, लांबसडक होण्यास मदत मिळते. 

चपला बूट घातल्याने पायांवर काळे - पांढरे पट्टे उमटलेत ? ५ उपाय - टॅनिंग कमी -त्वचा दिसेल एकसमान...

२. मेथी दाण्यांचे तेल :- मेथी दाण्यांच्या पेस्ट प्रमाणेच आपण केसांवर मेथी दाण्यांचे तेल देखील लावू शकतो. मेथीचे तेल बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात चमचाभर मेथीचे दाणे घालून हे दोन्ही गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे. त्यानंतर हे तेल थोडे कोमट करून स्कॅल्प व केसांच्या मुळांशी लावून घ्यावे. आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर हे तेल लावून मालिश करुन घ्यावे. यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. 

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

३. मेथी हेअर मास्क :- केस हेल्दी, घनदाट, लांबसडक, मजबूत करण्यासाठी तसेच केसांचे बिघडलेले आरोग्य व सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी आपण मेथी हेअर मास्कचा वापर करु शकतो. ३ टेबलस्पून मेथी दाणे घेऊन ते रात्रभर पाण्यांत भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी या मेथी दाण्यांची पेस्ट बनवून घ्यावी. या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळून मेथी दाणे व लिंबाच्या रसाचा हेअर मास्क बनवून केसांना लावावा. हा हेअर मास्क केसांच्या मुळाशी लावून अर्धा तास तसाच ठेवावा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा हेअर मास्क केसांना लावल्यामुळे हेअर ग्रोथ चांगली होण्यासोबतच केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

Web Title: 3 Ways Fenugreek Methi Seeds Benefits Your Hair Health, truggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek Methi Seeds May Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.