Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...

उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...

3 Ways To Use Sandalwood For Oily Skin : Summer Skin Care Routine Using Sandalwood : 3 Ways To Use Sandalwood To Remove Oil From Skin : त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी सारखी पावडर चोपडताय? चंदनाचा या ३ पद्धतीने असा करा वापर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 14:53 IST2025-03-03T14:41:26+5:302025-03-03T14:53:28+5:30

3 Ways To Use Sandalwood For Oily Skin : Summer Skin Care Routine Using Sandalwood : 3 Ways To Use Sandalwood To Remove Oil From Skin : त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी सारखी पावडर चोपडताय? चंदनाचा या ३ पद्धतीने असा करा वापर...

3 Ways To Use Sandalwood For Oily Skin Summer Skin Care Routine Using Sandalwood 3 Ways To Use Sandalwood To Remove Oil From Skin | उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...

उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...

आता हळूहळू गुलाबी थंडीचे दिवस संपून रणरणता उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाच्या झळा काहीवेळा नकोशा वाटतात. याचबरोबर उन्हाळ्यात इतर आरोग्याच्या लहानसहान कुरबुरी तर सुरु असतात परंतु सोबतच स्किनचे अनेक प्रॉब्लेम्स देखील सतावतात. उन्हाळ्यात वाढती उष्णता आणि गरमी यामुळे आपली त्वचा अनेकदा (3 Ways To Use Sandalwood For Oily Skin) ऑयली, चिकट होते. त्वचा अशी वारंवार ऑयली झाल्याने त्वचेवर धूळ, माती, वातावरणातील धूलिकण येऊन चिकटतात. यामुळे काहीवेळा आपल्या त्वचेच्या छिद्रांत अशी घाण साचून त्वचा हळूहळू (Summer Skin Care Routine Using Sandalwood) खराब होऊ लागते. इतकेच नव्हे, जर त्वचा आधीच तेलकट असेल आणि उन्हाळयात येणाऱ्या घामामुळे जर ती आणखीनच तेलकट होऊ लागली तर त्वचेच्या समस्या वाढू लागतात(3 Ways To Use Sandalwood To Remove Oil From Skin).

उन्हाळ्यात जर वारंवार या त्वचेच्या तेलकटपणाची समस्या सतावत असेल तर आपण चंदनाचा वापर करू शकतो. त्वचेच्या तेलकटपणासाठी चंदन वापरण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. चंदन त्याच्या थंड, तेल शोषक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यासाठीच तेलकट त्वचेसाठी चंदनाचा वापर करणे अधिक फायदेशीर मानले जाते. RVMUA अकादमीच्या संस्थापक, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ठ यांनी तेलकट त्वचेसाठी चंदनाचा (Sandalwood Powder For Oily Skin) वेगवेगळ्या प्रकारे वापर कसा करु शकतो याबद्दल अधिक माहिती दिली आहे. उन्हाळ्यांत तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी, चंदन पावडरच्या मदतीने वेगवेगळ्या पद्धतीचे फेसमास्क बनवणे फायदेशीर ठरू शकते. चंदनाचे हे क्लिंजिंग फेसमास्क त्वचेतील केवळ घाण काढून टाकत नाही तर छिद्रे देखील उघडतो. यामुळे त्वचा जास्त तेलकट किंवा चिकट दिसत नाही.

त्वचेचा ऑयलीपणा कमी करण्यासाठी चंदन... 

१. डीप क्लींजिंग फेसमास्क :- ऑयली त्वचेसाठी डीप क्लींजिंग फेसमास्क तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून चंदन पावडर व मुलानी माती तसेच आवश्यकतेनुसार गुलाब पाण्याची गरज लागणार आहे. डीप क्लिंजिंग फेसमास्क बनवण्यासाठी, सगळ्यांत आधी एका भांड्यात  प्रत्येकी १ टेबलस्पून चंदन पावडर आणि मुलतानी माती मिसळा. आता गरजेनुसार गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. सगळ्यांत शेवटी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

आयब्रोज खूपच पातळ आहेत? महाग ब्यूटी ट्रिटमेंट्स नको तर करा ७ उपाय, भुवया दिसतील दाट...

२. चंदनाचे टोनर :- चंदन पावडरच्या मदतीने ऑयली त्वचेसाठी टोनर देखील तयार करता येतो. याच्या वापराने त्वचा ताजीतवानी होते तसेच तेलकट चेहऱ्यावर वारंवार येणारा तेलकटपणा नियंत्रित करण्यास मदत करते. तेलकट त्वचेसाठी टोनर तयार करताना आपल्याला १ कप गुलाबपाणी आणि १ टेबसलस्पून चंदन पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एक कप गुलाबपाण्यात एक चमचा चंदन पावडर घाला आणि ती मिक्स करा. आता तयार टोनर एका स्प्रे बाटलीत भरा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर दररोज हे टोनर वापरा.

आंघोळीच्या पाण्यांत टाका ही जादुई पोटली, त्वचेच्या समस्या होतील गायब - त्वचा दिसेल अधिकच सुंदर...

३. चंदन पावडर स्क्रब :- चंदन पावडरच्या स्क्रबने तेलकट त्वचेचा चिकटपणा कमी होऊन त्वचेचा रंग उजळवण्यास अधिक मदत होते. याव्यतिरिक्त, गुलाबपाणी त्वचेला आरामदायी अनुभव देते. चंदन पावडरचा स्क्रब तयार करण्यासाठी प्रत्येकी १/२ टेबलस्पून चंदन पावडर व बेसन आणि गरजेनुसार गुलाबपाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एका बाऊलमध्ये चंदन पावडर आणि बेसन समान प्रमाणात घ्या. आता गुलाब पाणी घालून मिक्स करा. ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार पद्धतीने हळूवारपणे स्क्रब करा. नंतर १० मिनिटे तसेच राहू द्या. शेवटी, त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा.

चेहऱ्यावर सर्वत्र पिंपल्स? मध-हळदीचा ‘हा’ उपाय करा, पिंपल्सचा त्रास कमी होतो सहज...

Web Title: 3 Ways To Use Sandalwood For Oily Skin Summer Skin Care Routine Using Sandalwood 3 Ways To Use Sandalwood To Remove Oil From Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.