Join us  

चमचाभर तूप करेल चेहऱ्यावर जादू, चेहरा दिसेल इतका तजेलदार की फोटो फिल्टरची गरजच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2023 4:54 PM

3 ways you can use ghee for soft, smooth, and radiant skin तूप खाल्ले की रुप येते ही म्हण शब्दश: खरी करणारा खास उपाय

आजकल लोकं सुंदर दिसण्यासाठी खूप खटाटोप करतात. चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स लावतात. काहींच्या त्वचेवर हे प्रॉडक्ट्स सूट करतात, तर काहींच्या नाही. अनेक जण फोटोमध्ये सुंदर दिसण्यासाठी विविध फिल्टरचा वापर करतात. ज्यामुळे आपली खरी त्वचा त्या फिल्टरमागे लपली जाते. व सुंदर त्वचा दिसून येते. पण फोटो काढताना फिल्टरचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपायांनी चेहऱ्यावर तेज आणा.

''खाशील तूप तर येईल रूप'' ही म्हण आपण नक्कीच ऐकली असेल. पूर्वीतल्या काळातील लोकं आपल्याला नेहमी असे म्हणायचे. त्यामुळे चेहऱ्यासाठी तूप हे वरदानापेक्षा कमी नाही. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, ब्युटीरिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक असतात. जे चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतात(3 ways you can use ghee for soft, smooth, and radiant skin).

शॅम्पू लावताना ९० % लोकं ‘ही’ चूक हमखास करतात, हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब सांगतात योग्य पद्धत

चेहऱ्याला तूप कसे लावाल?

- चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. यासाठी एका वाटीत १ चमचा तूप घ्या, त्यात अर्धा चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाबजलाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. या फेस्मास्कचा वापर ३ ते ४ वेळा करा, ज्यामुळे त्वचेवर तेज दिसून येईल.

मुठभर तांदळाचे करा फर्मेंटेड राइस वॉटर, केसांची होईल वाढ, हेअर ग्रोथसाठी उपयुक्त

- तुपामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे चेहरा उजळतो. जर चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर तुपाचा वापर करून पेस्ट लावा. यासाठी एका वाटीत तूप घ्या, त्यात केशर मिक्स करा. व ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, व ३० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

- सन टॅनिंग दूर करण्यासाठी आपण तुपाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत २ चमचे तूप घ्या, त्यात अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. याच्या वापराने चेहऱ्यावर चमकही येईल आणि टॅनिंगही दूर होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी