Lokmat Sakhi >Beauty > आता महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा ट्रिटमेंट्सची गरजच नाही, करा ही ३ सोपी योगासने, त्वचेवर येईल नॅचरल ग्लो...

आता महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा ट्रिटमेंट्सची गरजच नाही, करा ही ३ सोपी योगासने, त्वचेवर येईल नॅचरल ग्लो...

3 Yoga Poses For Glowing Skin : त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी करा सोपी योगासने, त्वचेवरील ग्लो टिकून राहील कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 11:59 PM2023-10-25T23:59:20+5:302023-10-26T00:16:05+5:30

3 Yoga Poses For Glowing Skin : त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी करा सोपी योगासने, त्वचेवरील ग्लो टिकून राहील कायम...

3 Yoga Asanas For Glowing Skin, Yoga For Glowing Skin, 3 Yoga Poses That Will Make Your Skin Glow | आता महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा ट्रिटमेंट्सची गरजच नाही, करा ही ३ सोपी योगासने, त्वचेवर येईल नॅचरल ग्लो...

आता महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा ट्रिटमेंट्सची गरजच नाही, करा ही ३ सोपी योगासने, त्वचेवर येईल नॅचरल ग्लो...

प्रत्येकाला आपली त्वचा ही ग्लोइंग, पांढरीशुभ्र दिसावी असे वाटत असते. आपली त्वचा तशी दिसण्यासाठी देखील आपण बरेच प्रयत्न देखील करतो. त्वचा अधिक सुंदर दिसून त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी आपण अनेक उपाय आजमावून बघतो. त्वचेचा रंग व पोत सुधारण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्किन केअर रुटीन फॉलो करण्यावर (Which type of yoga is best for glowing skin?) अधिक भर देतो. एवढेच करून आपण थांबत नाही तर काहीवेळा पार्लर, स्पामध्ये जाऊन अनेक महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतो. यासोबतच अनेकदा आपण बाजारांत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे महागडे प्रॉडक्ट्स देखील वापरतो(Yoga poses for glowing skin).

त्वचेसाठी या महागड्या ट्रिटमेंट्स आणि प्रॉडक्ट्सचा वापर करून त्याचा काही अंशी आपल्या त्वचेत (3 yoga poses that can give you bright and glowing skin) बाहेरुन फरक दिसतो. त्वचेवर हा बाहेरुन दिसणारा फरक काही काळासाठीच टिकून राहतो. परंतु केवळ बाहेरून फरक दिसणे योग्य नाही. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आतून नैसर्गिक चमक (EASY YOGA ASANAS THAT’LL HELP YOU GET GLOWING SKIN) येण्यासाठी काही नैसर्गिक उपाय देखील केले पाहिजेत. योगाच्या मदतीने आपण आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवू शकता. याबाबत योगतज्ज्ञ डॉ.नुपूर रोहतगी यांनी त्वचेचा चमकदारपणा वाढवण्यासाठी कोणती योगासन करावीत याबाबत मार्गदर्शन केले आहे(3 Yoga Poses That Will Make Your Skin Glow).

त्वचेचा चमकदारपणा वाढवण्यासाठी करा ही ३ सोपी योगासने :- 

१. सर्वांगासन :- हे आसन केल्याने तुमच्या त्वचेचा चमकदारपणा वाढण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. खरेतर, हे आसन केल्याने रक्ताचा प्रवाह डोके आणि चेहऱ्याकडे पोहोचतो, त्यामुळे त्वचेला जास्त ऑक्सिजन मिळतो. हे आपल्या त्वचेला मुक्तपणे श्वास घेण्यास मदत करते. 

गरम पाण्याने आंघोळ करताना लक्षात ठेवा काही गोष्टी, नाहीतर त्वचाविकार लागतील मागे - गाठावा लागेल स्किन स्पेशालिस्ट...

सर्वांगासन कसे करावे ? 

सर्वप्रथम जमिनीवर चटई घालून त्यावर झोपा. तुमचे पाय हळू हळू वर करा, त्यांना ९०° च्या कोनात आणा. आता नितंब वर करताना तुमचे पाय तुमच्या डोक्याच्या दिशेने आणा. तुमचे पाय, छाती आणि पोट एका सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना वर उचलत राहा. आपल्या तळहातांनी आपल्या कमरेला आधार द्या. तुमची हनुवटी तुमच्या छातीजवळ ठेवा. जोपर्यंत तुम्हाला आरामदायक वाटत असेल तोपर्यंत या स्थितीत राहा. या पोझमध्ये ३० सेकंद किंवा त्याहून अधिक काळ राहण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू तुमच्या पहिल्या स्थानावर परत या. हे करण्यासाठी, आपले नितंब हळुहळु खाली करा आणि कंबरेला आधार देत सामान्य स्थितीत परत या.

२. हलासन :- हलासन केल्याने तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी होते. हे आसन केल्याने पचनसंस्था तंदुरुस्त राहते आणि पचनसंस्था निरोगी राहिल्यास चेहरा उजळणे स्वाभाविक आहे. याशिवाय हे आसन चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे तुमची त्वचा घट्ट होते. योग्य रक्तप्रवाहामुळे त्वचेचे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होते.

पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

हलासन कसे करावे ? 

प्रथम योगा मॅटवर पाठीवर झोपा.आपले हात शरीराच्या जवळ ठेवा. तळवे जमिनीकडे राहतील अशा पद्धतीने उघडे ठेवा. तीन ते चार वेळा दीर्घ श्वास घ्या आणि शरीर हलासनासाठी तयार करा. आता हळूहळू श्वास घेत पाय वर उचला. पाय कंबरेपासून पूर्ण वर उचला जेणे करून पाय व शरीर यांचा ९० अंशाचा कोन बनेल व पोटाच्या स्नायूंवर ताण येईल. या स्थितीत काही सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.पाय वर करताना हाताने कंबरेला आधार द्या. त्यानंतर हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने वाकवा आणि डोक्याच्या मागे घेण्याचा प्रयत्न करा आणि पायांचे अंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. कंबरेवरून हात काढून सरळ जमिनीवर ठेवा. त्यानंतर कंबर जमिनीला समांतर राहील. तुम्हाला जमेल तितका वेळ या स्थितीत रहा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास सोडताना, हळूहळू पाय जमिनीवर परत आणा. 

३. पादहस्तासन :- तरुण आणि चमकदार त्वचा करण्यासाठी आपण पादहस्तासन देखील करू शकता. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. हे आपल्या त्वचेला मुक्तपणे श्वास घेण्यास मदत करते. त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्वचेवर सुरकुत्या किंवा पुरळ येण्याची समस्या कायम दूर होण्यास मदत मिळते. 

मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...

पादहस्तासन कसे करावे ? 

पाठीचा कणा ताठ करून उभे राहावे. पाय जवळ आणि हात शरीरालगत ठेवावेत. शरीर सैल सोडावे. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान ठेवावे. शरीर पुढच्या बाजूला हळुवारपणे झुकवावे. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवावा. कमरेपासून पुढच्या बाजूला झुकताना पाठ ताठच ठेवावी. त्याला बाक येऊ देऊ नका. शरीरावर कोणताही ताण देऊ नका. दोन्ही हाताची बोटे पावलांच्या शेजारी किंवा पावलांवर ठेवा. मानेच्या मागची बाजू सैल सोडा. पाय आणि गुडघे सरळ रेषेत आणि ताठ ठेवावेत. शांतपणे श्वसन सुरू ठेवावे.

Web Title: 3 Yoga Asanas For Glowing Skin, Yoga For Glowing Skin, 3 Yoga Poses That Will Make Your Skin Glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.