सकाळची सुरुवात आपण सगळेच आंघोळीनेच करतो, आणि पुढची कामं करायला घेतो (Bathing). आंघोळ केल्यानंतर घामाची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. पण आंघोळ करणं फक्त पुरेसं नाही (Skin care Tips). बऱ्याचदा साबणाच्या वापरानेही बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत.
जर आपल्याला स्किन इन्फेक्शन, तणाव कमी करणे आणि त्वचेवर नैसर्गिक चमक हवी असेल तर, आंघोळीच्या पाण्यात कापूर घालून आंघोळ करा. कापराचा वापर आपण पूजेसाठी करतो. पण याचा वापर स्किनसाठीही फायदेशीर ठरते. यामुळे अंगदुखीचाही त्रास कमी होतो. आंघोळीच्या पाण्यात कापूर घालून आंघोळ करण्याचे फायदे किती? पाहूयात(4 Amazing Benefits of Camphor for Skin Care & Health Care).
त्वचेच्या संसर्गापासून आराम
कापूरमध्ये अँटीबायोटिक, अँटिबॅक्टेरियल, गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे त्वचेच्या निगडीत अनेक समस्या दूर होतात. लहान मुरूम, मुरुमांचे डाग, पुरळ, त्वचेवर खाज आणि संसर्गापासून आराम मिळतो. जर आपल्याला स्किन इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर, आंघोळीच्या पाण्यात कपूर घालायला विसरू नका.
तणाव होईल दूर
कापराच्या सुगंधामुळे मनाला शांतता मिळते. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यात कापूर घालून स्नान करू शकता. कापराच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील सर्व थकवा दूर होतो. यासोबतच शरीर आणि मनालाही शांतता मिळते.
त्वचेवर येते नैसर्गिक चमक
आंघोळीच्या पाण्यात कापूर घालून स्नान केल्याने, त्वचेच्या समस्या दूर होतातच, शिवाय काही दिवसात त्वचेवर नैसर्गिक चमकही दिसून येते. यासोबतच खोबरेल तेलात कापूर मिसळून केस आणि टाळूला मसाज केल्याने केसांचीही वाढ होते.
कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय
अंगदुखीपासून आराम
डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास असेल तर, कोमट पाण्यात कापूर घालून आंघोळ करा. यासाठी कोमट पाणी एका बादलीमध्ये घ्या. त्यात काही कापराचे गोळ्या घाला. या पाण्याने आंघोळ करा. यामुळे अंगदुखीचा त्रास दूर होईल.