अंगावर पुरळ येणे, स्काल्पवर खाज सुटणे, सांधेदुखीचा त्रास आणि पायात संसर्ग या समस्या गंभीर आहेत. पण या समस्येवर उपाय म्हणून आपण कापुराचा वापर करू शकता. कापूर फक्त पूजेसाठी वापरण्यात येत नसून, त्याचा वापर स्किन व केसांसाठी देखील केला जाऊ शकतो. डोक्यात खाज सुटल्याने स्काल्प इन्फेक्शन व कोंडा यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशा समस्यांपासून मुक्त होण्यासाठी कापुराचा वापर करून पाहा.
कापूरमध्ये लिनालूल, युजेनॉल, सॅफ्रोल, सिनेओल, ß-मायरसीन, नेरोलिडॉल, कॅम्फेन आणि बोर्निओल इत्यादी घटक आढळतात. जे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कापुराचा वापर नेमका कसा करावा हे पाहूयात(4 Amazing Benefits Of Camphor For Your Skin, Hair, And Health).
सांधेदुखीपासून आराम
हेल्थलाइन वेबसाईटनुसार, ''सांधेदुखीपासून आराम हवं असल्यास आपण कापुराचा वापर करू शकता. कापूरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे वेदना खेचून नसांना बरे करण्यास मदत करतात. यासाठी तेलात कापूर पावडर मिक्स करून उकळवा, हे तेल सांधेदुखीच्या वेदनेवर लावा. व काही मिनिटांसाठी मसाज करा. याने नक्कीच आराम मिळेल.
स्किनच्या समस्या आता विसरा, चमचाभर साखरेचा करून पाहा ३ स्क्रब, त्वचा दिसेल सॉफ्ट - कोमल
डोक्याची खाज होईल कमी
काहींच्या स्काल्पवर तीव्र खाज सुटते. ही खाज कोंडा किंवा इन्फेक्शनमुळे येऊ शकते. या समस्येपासून सुटका हवी असल्यास कापुरचा वापर करून पाहा. कापुरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे कोंडा नष्ट करण्याचे काम करतात. यासाठी खोबरेल तेलामध्ये कापूर पावडर मिक्स करून स्काल्पवर लावा. व काही वेळानंतर केस धुवा.
शरीरावर पुरळ उठणार नाही
काहींच्या शरीरावर पुरळ उठण्याची समस्या निर्माण होते. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर खाज सुटते. यापासून सुटका हवी असल्यास लवंग तेलामध्ये कापूर पावडर मिक्स करा, व शरीरावर लावा. काही वेळानंतर आंघोळ करा. लवंग तेल हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे, ज्यामुळे खाज सुटण्यापासून लवकर आराम मिळतो.
फक्त १ चमचाभर मेथी दाणे घ्या, जाड घट्ट लांब केसांसाठी ३ सोपे उपाय
मुरुमांवर गुणकारी
मुरुमांमुळे आपले सौंदर्य कमी होते. तुळशीच्या पानांच्या मदतीने आपण मुरुमांचे डाग कमी करू शकता. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा. व या पेस्टमध्ये कापूर पावडर मिक्स करून मुरुमांच्या डागांवर लावा. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे मुरुमांमधील घाण निघून जाईल. व त्वचा तुकतुकीत दिसेल.