लांबसडक, मऊ, चमकदार केसांसाठी आपण बऱ्याचदा महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतो. मात्र या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या अधिक वाढू शकतात. केसगळणे, कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे या केसांच्या बाबतीतल्या सामान्य समस्या आहे. असे असले तरीही केसांतील कोंडा ही समस्या लहान असली तरी त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. वेळीच यावर उपाय नाही केले तर खांद्यावर तसेच पाठीवर बारीक पुरळ येण्यास सुरुवात होते. तसेच कानामध्ये देखील वारंवार खाज येण्यास सुरुवात होते.
केसातील कोंडा दूर व्हावा म्हणून काही जणं बरेच पैसे खर्च करतात किंवा महागड्या ट्रिटमेंटसाठी पार्लरचा पर्याय निवडतात. मात्र या ट्रिटमेंटचा तात्पुरताच परिणाम जाणवतो. त्यानंतर केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. पण कोंड्यापासून कायमची सुटका हवी असेल तर काही आयुर्वेदिक उपचार करणं गरजेचं आहे. केसातील कोंडा घालवण्यासाठी नेमका कोणता आयुर्वेदिक उपचार करावा ? ते पाहूयात(4 Benefits & Best Ways To Use Camphor For Healthy Hair).
केसातील कोंडा काढण्यासाठी कापूराचा वापर...
आपल्या घरामध्ये पूजेसाठी कापूरचा वापर केला जातो. कापराच्या वडीचा नैसर्गिक उपचारांच्या स्वरुपातही वापर केला जातो. याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास केसगळती आणि कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. कापूर टाळूवर लावल्यास या भागातील रक्त प्रवाह वाढतो आणि खाज देखील कमी होते. कापूरामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे केसगळती व केसातील कोंड्याची समस्या रोखण्यास मदत मिळू शकते.
चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...
१. केसांतील कोंडा कमी करण्यासाठी नारळाचे तेल व कापूर (Camphor and Coconut Oil for Dandruff) हा एक सर्वोत्तम उपाय आहे. नारळाच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून लावल्यास आपल्याला कोंड्यापासून लवकरात लवकर सुटका मिळू शकते. कापूरच्या गोळ्यांची बारीक पूड करुन ती नारळाच्या तेलामध्ये मिक्स करुन घ्यावी. यानंतर कापूरची पूड तेलामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत तेल गरम करा. हे तेल थोडे कोमट झाले की हलक्या हाताने सर्व केसांना व केसांच्या मुळांना लावून घ्यावे. हा उपाय आठवड्यातून किमान दोन वेळा केल्यास केसांतील कोंड्याची समस्या हळुहळु दूर होईल. खोबरेल तेल आणि कापुराच्या मिश्रणाने केसातील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. कारण या मिश्रणामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे केसातील एलर्जी, खाज, बुरशी, बॅक्टेरिया इत्यादी गोष्टी दूर करतात. परिणामी केसातील कोंडा कमी होतो. केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केसांमध्ये कोंड्याची (Dandruff) समस्या निर्माण होते. अशावेळेस रात्री झोपण्याआधी हे कापूर तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसात होणाऱ्या कोंड्याचे प्रमाण कमी होईल.
२. कापूरच्या गोळ्यांची बारीक पूड करुन त्यात कडुनिंबाच्या पानांची पेस्ट घालावी. हे मिश्रण केसांत कोंडा असलेल्या ठिकाणी हलक्या हातांनी लावून मसाज करावा. यामुळे देखील केसातील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस
३. ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूरच्या गोळ्यांची बारीक पूड करुन घालावी व या तेलाने केसांना मालिश करावे. या उपायामुळे देखील केसांतील कोंडा हळुहळु कमी केला जाऊ शकतो.
४. कापूरच्या गोळ्यांची बारीक पूड करुन त्यात रिठा पावडर व दही घालून हेअर मास्क तयार करावा. हे हेअर मास्क केसांना लावल्यास केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते. तसेच केसांत वारंवार येणारी खाज, स्कॅल्पला होणारे फंगल इंफेक्शन दूर करण्यात हा उपाय प्रभावी ठरतो.
महागड्या ट्रिटमेण्ट केल्यावर केसांना तेल लावावे की नाही ? हेअर एक्सपर्ट सांगतात, एक सिक्रेट...