त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण विविध उत्पादनांचा वापर करतो (Coconut Oil). ज्यात तेलांचाही समावेश आहे. खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरात उपलब्ध आहे (Healthy Skin). या तेलाचा वापर आपण मुख्यतः केसांसाठी करतो. पण आपण कधी याचा वापर त्वचेसाठी करून पाहिलं आहे का? तुकतुकीत त्वचा हवी असेल तर, चेहऱ्यावर खोबरेल तेल लावायला सुरुवात करा.
हाडांतील कॅल्शियम शोषतात हे '६' पदार्थ, ऐन तारुण्यात हाडं ठणकतील - कंबर, गुडघ्याची दुखणी वाढेल
खोबरेल तेलामध्ये लॉरिक ऍसिड, फॅटी ऍसिड आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे ड्राय झालेली त्वचा लवकर रिकव्हर होते. शिवाय चेहऱ्याच्या निगडीत अनेक समस्या दूर होतील. चेहऱ्यावर खोबरेल तेलाचा नेमका वापर कसा करावा?(4 Benefits of Coconut Oil for Healthy Skin).
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत
- ज्या लोकांच्या चेहऱ्यावर जास्त मुरूम आणि तेलकट आहे, त्यांनी खोबरेल तेलाचा वापर टाळावा. रात्रभर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांच्या चेहऱ्यावर मुरूम उठण्याची समस्या वाढू शकते.
- सनस्क्रीन म्हणून चेहऱ्यावर खोबरेल तेलही लावले जाते, जे योग्य नाही. खोबरेल तेल आणि सनस्क्रीन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. ज्यांचे त्वचेसाठी वेगवेगळे फायदे आहेत.
- खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. जर चेहरा खूप ड्राय असेल तर, आपण चेहऱ्यावर खोबरेल तेलाचा वापर नियमित करू शकतात.
मोबाइल दाखवला नाही तर मुलं जेवतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी, मोबाइल पाहण्याची सवय सुटेल चटकन
- कोरडी त्वचा असलेले लोक चेहऱ्यावर जास्त प्रमाणात खोबरेल तेल लावू शकतात. आपण रात्रभर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून झोपू शकता. यासाठी तळहातावर २-३ थेंब खोबरेल तेल घ्या. नंतर चेहऱ्यावर हलका मसाज करा. आपण त्यात चिमुटभर हळदही मिक्स करू शकता.
- खोबरेल तेलात हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने, मुरुमातील बॅक्टेरिया नष्ट होतील. मुरूम उठले असतील तर, त्याचे डागही होतील.
- चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्यानंतर रात्रभर किंवा ४ तासानंतर चेहरा धुवू शकता. यामुळे स्किन क्लिअर होईल.