Join us  

फेशियल केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर वाफ घेण्याचे ४ फायदे, मिळवा चमकदार सुंदर ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 7:38 PM

What Dose Facial Steaming Do ? Benefits & Tips : फेशियल केल्यानंतर चेहेरा झाकून वाफ घ्यावी. वाफ घेतल्याने चेहेऱ्यावर नक्की काय परिणाम होतो, पाहूया..

आपण सगळेच आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेतो. खासकरून स्त्रिया या आपल्या त्वचेबाबतीत खूपच काळजी घेतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून स्वत:च्या सौंदर्यासाठी थोडा वेळ काढणं आणि घरच्या घरी का होईना जमेल तितक्या गोष्टी करणं फार महत्त्वाचे असते. चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी  आपल्याला अधूनमधून चेहऱ्याचे फेशियल करणे आवश्यक असते. फेशियलमुळे आपल्याला सौंदर्याचे अनेक फायदे तर मिळतातच पण त्याचे मानसिक फायदेही होतात. यामुळे त्वचेचा रंग तर सुधारतोच, पण त्यामुळे आपला ताणही दूर होतो. फेशियल हे विविध प्रकारचे आहेत आणि ते वेगवेगळ्या त्वचेच्या समस्यांना दूर करण्यासाठी केले जाते.सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला चकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते. 

आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी जितकी आपल्याला आतून काळजी घ्यावी लागते तितकीच त्वचेची काळजी बाहेरूनदेखील घ्यावी लागते. बाहेरून त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमी फेशियलचा आधार घेतो. चेहऱ्यावर फेशियल करताना मसाज, क्लीन्झर, टोनर, पिल ऑफ मास्क, डिटॅन मास्क अश्या वेगवेगळ्या क्रीम्स, जेल आणि मास्क वापरले जातात. या सगळ्या बरोबरच फेशियल केल्यानंतर आपल्या चेहेऱ्यावर त्याचे उत्तम परिणाम दिसण्यासाठी वाफ दिली जाते. फेशियल नंतर चेहेऱ्यावर वाफ घेणे किती महत्वाचे आहे तसेच वाफ घेतल्याने चेहेऱ्यावर त्याचा काय फरक पाहायला मिळतो ते पाहूयात(4 Benefits of Face - Steaming and How to Do It at Home).

फेशियल नंतर चेहेऱ्यावर वाफ का घ्यावी ? 

१. त्वचेची स्वच्छता :- फेशियलनंतर वाफ घेतल्याने चेहेऱ्याची त्वचा स्वच्छ करण्यास मदत केली जाते. वाफ घेतल्यामुळे चेहेऱ्याच्या त्वचेची छिद्रे उघडतात. यामुळे त्वचेमधील घाण आणि मृत त्वचा निघून जाते. ज्यांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी वाफ घेणे हा रामबाण उपाय आहे. यामुळे चेहेऱ्याची स्वच्छता चांगली होते.

एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...

२. रक्ताभिसरण होण्यास मदत :- वाफ घेतल्याने त्वचेमध्ये रक्ताभिसरण चांगले होते. जरी आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली नाही, परंतु त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी वाफ घेतली तर ते त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. काहीवेळा जेव्हा त्वचा निस्तेज आणि रुक्ष जाणवू लागते तेव्हा चेहेऱ्याला वाफ द्यावी जेणेकरून रक्ताभिसरण चांगले होईल आणि यामुळे त्वचा पुन्हा पहिल्यासारखी चमकू लागेल. 

३. त्वचा चिरतरुण राहण्यास मदत मिळते :- जसजसे आपले वय वाढत जाते तशी आपली चेहेऱ्याची त्वचा लूज पडून लटकू लागते. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार त्वचेवर सुरकुत्या, डाग तसेच इतर वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. या सगळ्या चेहेऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून किमान ३ वेळा तरी वाफ घेणे गरजेचे आहे. परंतु आपल्याला तितका वेळ नसेल तर आपण किमान १५ दिवसांतून एकदा वाफ घ्यावी. 

रात्री मेकअप काढायला विसरलात? ५ सोप्या टिप्स - एवढे नाही केले तर चेहरा खराब झालाच समजा...

४. स्क्रिन हायड्रेशन :- अनेकदा कामामध्ये आपण शरीराला आवश्यक इतके पाणी प्यायला विसरतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. त्वचेचा पोत व आरोग्य वाढविण्यासाठी चेहेऱ्यावर वाफ घ्यायला हवी. यामुळे त्वचेचे हायड्रेशन उत्तम राहाते आणि त्वचा निस्तेज आणि काळी दिसत नाही. असे केल्यामुळे आपला चेहेरा नेहमी फ्रेश दिसतो.

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

स्टीम फेशियल करण्याची सोपी पद्धत...  

स्टीम फेशियल करणे खूप सोपे असते. यासाठी सर्वप्रथम कोणत्याही फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. आता एका भांड्यात गरम पाणी घ्यावे. आणि त्यात थोडेसे गरजेपुरता तेल घालावे. यानंतर टॉवेल घेऊन तोंड झाकून वाफ घ्यावी. एक गोष्ट लक्षात ठेवा की चेहरा व्यवस्थित झाका. त्यामुळे वाफ बाहेर येत नाही. स्टीम फेशियल करताना चेहरा साधारण ५ मिनिटे भिजवा. तसेच, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. स्टीम घेतल्यानंतर, तुम्ही फेशियल क्ले मास्क देखील लावू शकता. किंवा चेहऱ्यावर टोनरही लावू शकता. याच्या मदतीने तुम्हाला स्टीम फेशियलचे फायदे लगेच दिसतील.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स