सुंदर, घनदाट, काळेभोर केस कोणाला नको. केसांमुळे सौंदर्यात आणखी भर पडते. जस - जसा काळ बदलत चालला आहे, तस तसे केसांवर अनेक प्रयोग केले जातात. ज्यामुळे केस पातळ तर होतातच, यासह केस गळती, केस अकाली पांढरे होणे, केसात कोंडा, केसांची वाढ खुंटणे यासह अनेक समस्या निर्माण होतात.
मुख्य म्हणजे केस पातळ होतात. ज्यामुळे ते निर्जीव आणि रफ दिसतात. केसांची ग्रोथ व्हावी, व पातळ केस पुन्हा घनदाट दिसावे म्हणून या ४ तेलांचा वापर करून पाहा. केसांच्या मुळांवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जर केसांची मुळं सैल झाली तर, केस गळतीला सुरुवात होते. ही समस्या सोडवायची असेल तर, केसांवर या ४ तेलांचा वापर करून पाहा(4 best hair oils for healthy, hydrated hair).
या ४ तेलांचा केसांवर करून पाहा वापर
खोबरेल तेल
केसांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून खोबरेल तेलाचा वापर करून पाहा. खोबरेल तेल, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध असतात. ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. खोबरेल तेल लावताना आपण त्यात कांद्याचा रस, मेथी दाणे किंवा कडीपत्ता घालून, तेल कोमट करून केसांवर लावू शकता. यामुळे पातळ केस दाट होतील.
तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्वचा ऑईली होते का? नक्की कोणते स्किनकेअर रुटीन फॉलो करावे? काय खावे?
बदाम तेल
बदाम तेल केसांसाठी फायदेशीर ठरते. बदाम तेल व्हिटॅमिन ई, ओमेगा -३, फॅटी ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. या तेलातून केसांना प्रोटीन्स देखील मिळतात. केसांवर लावण्यासाठी बदाम तेल कोमट गरम करा. नंतर तेल स्काल्पवर लावून मसाज करा. यामुळे केसांचे क्यूटिकल उघडतात. ज्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते.
अर्गन ऑइल
अर्गन ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते. या तेलामध्ये फॅटी ऍसिड आणि ओलेइक ऍसिड असते, जे त्वचा आणि केस दोघांसाठी फायदेशीर ठरते. केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळावे, यासाठी आठवड्यातून २ वेळा केसांवर अर्गन ऑइलचा वापर करा.
रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..
एरंडेल तेल
एरंडेल तेलाला कॅस्टर ऑइल देखील म्हणतात. हे तेल चिकट स्वरूपाचे असते, म्हणून त्यात खोबरेल तेल मिसळून केसांवर लावा. एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण असतात. ज्यामुळे केसांचे अनेक समस्या सुटतात. ज्यामुळे केस काळेभोर घनदाट दिसतात.