Lokmat Sakhi >Beauty > पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

4 Best Oils For Healthy Hair Growth & Thickness केस गळतात, पातळ-विरळ झाले तर महागडे उपाय केले जातात त्यापेक्षा हे घरगुती तेल लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 01:28 PM2023-05-05T13:28:56+5:302023-05-05T13:29:52+5:30

4 Best Oils For Healthy Hair Growth & Thickness केस गळतात, पातळ-विरळ झाले तर महागडे उपाय केले जातात त्यापेक्षा हे घरगुती तेल लावा

4 Best Oils For Healthy Hair Growth & Thickness | पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

आपले केस लांब - घनदाट असावेत, असे कोणाला नाही वाटत. प्रत्येक व्यक्तीचा लूक हा केसांमुळे खुलून दिसतो. पण काही कारणास्तव केसांची वाढ खुंटते. त्यामुळे केस पातळ व निर्जीव दिसतात. बदलत्या व खराब जीवनशैलीमुळे केसांमध्ये अनेक बदल घडतात. केसांची वाढ कमी होते, केस पातळ दिसतात, केसांमध्ये कोंडा, केस गळणे. यासह अनेक समस्या उद्भवतात.

या समस्येमुळे केस पातळ होतात. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा कमी होते. केसांची वाढ व केस घनदाट व्हावे असे वाटत असेल तर, काही घरगुती तेलांचा वापर करून पाहा. यामुळे योग्य प्रमाणात केसांची ग्रोथ होईल(5 Best Oils For Healthy Hair Growth & Thickness).

केसांची वाढ व घनदाट करण्यासाठी तेल

तिळाचे तेल

तिळाचा सहसा पदार्थात वापर होतो. आपण तिळाच्या तेलाचा वापर केसांसाठी देखील करू शकता. तिळाच्या तेलात फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते. हे तेल केसांना दाट तर बनवतेच, यासह स्काल्पमधील कोंडा दूर करण्यास मदत करते. ज्यामुळे केसांची वाढ योग्यरित्या होते.

आवळ्याचे तेल

व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा तेल केसांना पोषण देते. या तेलामधून कोलेजन प्रोटीन तयार होते, जे केसांच्या वाढीस मदत करते. याशिवाय या तेलाचा चांगला प्रभाव केसांच्या कूपांना पोषण देण्यावर दिसून येतो. आवळा तेल व्हिटामिन - ई, अँटीबैक्टीरियल आणि अँटी डँड्रफ गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे केसांची वाढ होते.

बदाम तेल

बदामाचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या तेलाने पातळ केसांची समस्या दूर होते. व केस घनदाट दिसतात. बदाम तेल जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, झिंक, प्रोटीन आणि फॅटी अॅसिड आढळतात. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते.

एरंडेल तेल

एरंडेल तेल अतिशय चिकट स्वरुपात असते. या तेलामुळे केसांना अधिक प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. या तेलामध्ये रिकिनोलेइक अ‍ॅसिड असते. यासह अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण आढळतात. ज्यामुळे केसांच्या भागातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं सुरू राहते, व केसांची वाढ होते.

Web Title: 4 Best Oils For Healthy Hair Growth & Thickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.