Lokmat Sakhi >Beauty > फाटे फुटलेल्या-तुटणाऱ्या केसांसाठी वापरा हे ४ बेस्ट शाम्पू, केस होतील दाट-चमकदार

फाटे फुटलेल्या-तुटणाऱ्या केसांसाठी वापरा हे ४ बेस्ट शाम्पू, केस होतील दाट-चमकदार

4 best shampoos for split ends and hair breakage : रुक्ष, कोरड्या केसांसाठी शाम्पूचे ४ पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 05:56 PM2023-12-24T17:56:50+5:302023-12-24T17:58:32+5:30

4 best shampoos for split ends and hair breakage : रुक्ष, कोरड्या केसांसाठी शाम्पूचे ४ पर्याय...

4 best shampoos for split ends and hair breakage : Use these 4 best shampoos for split-brittle hair to grow thick-long hair | फाटे फुटलेल्या-तुटणाऱ्या केसांसाठी वापरा हे ४ बेस्ट शाम्पू, केस होतील दाट-चमकदार

फाटे फुटलेल्या-तुटणाऱ्या केसांसाठी वापरा हे ४ बेस्ट शाम्पू, केस होतील दाट-चमकदार

आपले केस छान सिल्की आणि लांबसडक असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही ना काही कारणाने ते खराब होतात. कधी केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो तर कधी ते पांढरे होतात. काही वेळा केस प्रमाणाबाहेर गळतात नाहीतर ते खूप जास्त कोरडे होतात आणि त्यांना फाटे फुटून ते तुटायला लागतात. अशावेळी केस पातळ होण्याची आणि त्यांची चमक कमी होण्याचीही शक्यता असते. साधारणपणे आपण आपल्या केसांना सूट होणारा शाम्पू वापरत असतो. पण समस्येचा विचार करुन त्यानुसार योग्य त्या शाम्पूची निवड करायला हवी. हे मात्र आपल्या लक्षात येत नाही आणि आपण आहे तोच शाम्पू वापरत राहतो. पण केसांना प्रमाणापेक्षा जास्त फाटे फुटलेले असतील आणि केस तुटत असतील तर त्यासाठी कोणत्या शाम्पूची निवड करायला हवी हे आज आपण समजून घेणार आहोत (4 best shampoos for split ends and hair breakage). 

१. Love Beauty & Planet Curry Leaves, Biotin & Mandarin Shampoo 

हा शाम्पू सल्फेट फ्रि असून केस तुटण्याच्या समस्येपासून दूर राहायचे असल्यास या शाम्पूचा चांगला उपयोग होतो. यामध्ये कडीपत्ता आणि बायोटीन असल्याने तो शाम्पू केवळ केसांचे पोषण करत नाही तर केसांचा पोत सुधारण्यास आणि केस वाढण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. हा शाम्पू एकदा वापरायला सुरुवात केल्यावर त्याचा वास आणि त्यामुळे मिळणारे रिझल्ट पाहूनच महिला याला पसंती देतात. या शाम्पूच्या ४०० मिलीलीटरच्या बाटलीची किंमत ऑनलाईन साधारण ५५० इतकी आहे.

(Image : Google)
(Image : Google)

 

 २. Bare Anatomy Damage Repair Hair Shampoo

हा शाम्पू केसांचा पोत सुधारण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठीही अतिशय फायदेशीर असतो. कोरड्या झालेल्या किंवा पोत खराब झालेल्या केसांसाठी हा शाम्पू अतिशय उत्तम ठरु शकतो. यामधील घटक केसांना प्रोटीन घटक पुरवत असल्याने केसांचे पोषण होण्यास हा शाम्पू फायदेशीर ठरतो. 

३. Matrix Opti. Repair Professional Liquid Protein Shampoo

केस मुळापासून मजबूत करणे आणि केसांच्या वाढीस चालना देणे यासाठी हा शाम्पू फायदेशीर ठरतो. केसांना कोरडे आणि निस्तेज होण्यापासून वाचवण्यासाठी हा शाम्पू फायदेशीर असतो. केसांचे फाटे कमी होण्यासोबतच कोरडेपणा कमी होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.

(Image : Google)
(Image : Google)

४. L’OREAL PROFESSIONNEL PARIS Absolut Repair Shampoo

केस हायड्रेटेड असतील तर ते चमकदार आणि चांगले दिसतात पण त्यांना पुरेशी आर्द्रता मिळाली नाही तर ते रुक्ष होतात. लॉरीयलच्या शाम्पूने केसांचे उत्तम पोषण होण्यास मदत होते आणि त्यामुळे केस मजबूत आणि सिल्की राहण्यास मदत होते.

Web Title: 4 best shampoos for split ends and hair breakage : Use these 4 best shampoos for split-brittle hair to grow thick-long hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.