Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवा, फक्त ४ गोष्टी करा- दिवाळीत चेहऱ्यावर येईल तेज

दिवाळीत चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवा, फक्त ४ गोष्टी करा- दिवाळीत चेहऱ्यावर येईल तेज

4 daily habits that look younger than our age : तरुण दिसण्यासाठी खूप पैसे घालवण्यापेक्षा रोज न चुकता काही गोष्टी करायला हव्यात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 12:16 PM2024-10-28T12:16:14+5:302024-10-28T18:07:22+5:30

4 daily habits that look younger than our age : तरुण दिसण्यासाठी खूप पैसे घालवण्यापेक्षा रोज न चुकता काही गोष्टी करायला हव्यात..

4 daily habits that look younger than our age : Look young in Diwali, do 4 things without fail, get a young look... | दिवाळीत चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवा, फक्त ४ गोष्टी करा- दिवाळीत चेहऱ्यावर येईल तेज

दिवाळीत चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवा, फक्त ४ गोष्टी करा- दिवाळीत चेहऱ्यावर येईल तेज

आपण कायम आहोत त्या वयापेक्षा तरुण दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. महिलांना तर आपलं वय कधी वाढूच नये आणि आपण कायम लहान दिसावं असंच वाटतं. मग एखादा केस पांढरा झाला किंवा चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या यायला लागल्या की महिला लगेचच अस्वस्थ होतात. कोणते उपाय करु आणि कोणते नको असे त्यांना होऊन जाते. मग कधी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस केल्या जातात नाहीतर हेअरकट, मेकअप करुन आपले वय लपवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे वय म्हणावे तितके लपतेच असे नाही. मग हे सगळे करावे लागू नये तर त्वचेची आधीपासूनच योग्य पद्धतीने काळजी घेतली तर त्याचा फायदा होतो. ऋतूबदल होताना त्वचा नेहमीपेक्षा थोडी कोरडी होते. अशावेळी त्वचेची जास्त काळजी घ्यायला हवी. पण काळजी घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे पाहूया (4 daily habits that look younger than our age)..

१. सनस्क्रीन लावणे

आपण बाहेर जाताना घाईघाईत केस आवरतो. काजळ, लिपस्टीकही न विसरता लावतो. पण सनक्रीन लोशन लावतोच असे नाही. मात्र यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते.  सनस्क्रीन हा आपल्या रोजच्या स्कीन केअर रुटीनचा भाग व्हायला हवा. सूर्याच्या किरणांमुळे त्वचा काळवंडणे, सुरकुतणे, डाग पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच नियमित सनस्क्रीन लोशन लावले तर या समस्यांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. चेहऱ्याचे व्यायाम 

फेस योगा, प्राणायाम इतर हावभाव यांचा आपल्या चेहऱ्याचा त्वचेवर बराच परीणाम होत असतो. नियमितपणे फेस योगा आणि प्राणायाम केला तर त्वचा नितळ राहण्यास मदत होते. दीर्घ श्वसनाचे व्यायाम आणि रिलॅक्स करणारे काही व्यायाम केल्यास त्याचा मनावर, शरीरावर आणि त्वचेवरही चांगला परीणाम होतो. म्हणूनच चेहऱ्याचे व्यायाम नियमितपणे करायला हवेत. 

३. चेहरा सतत धुवायला हवा

आपण साधारणपणे सकाळी आंघोळीच्या वेळी एकदा चेहरा धुतो आणि बाहेरुन घरी आल्यावरही चेहरा धुतो. मात्र त्वचा हायड्रेट ठेवायची असेल तर तितके पुरेसे नसते. त्यामुळे दिवसभरात घाम आल्यावर किंवा मधल्या वेळीही चेहऱ्यावर पाणी मारल्याने त्वचा ताजीतवानी राहण्यास मदत होते. त्वचेला ओलावा मिळाल्याने ती नकळत तरुण राहण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. ब्रेन अॅक्टीव्हीटीज 

आपला मेंदू जर ताजातवाना राहीला तर आपण नकळत ताजेतवाने राहतो. हे जरी खरे असले तरी मेंदूचा ताजेपणा आपण करत असलेल्या गोष्टींवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे या क्रिया त्वचेलाही ताजे ठेवण्यास उपयुक्त ठरतात. वेगवेगळ्या प्रकारची कोडी, सुडोकु, बुद्धीबळासारखे खेळ यांमुळे मेंदू, शरीर आणि त्वचा ताजी राहते. 

Web Title: 4 daily habits that look younger than our age : Look young in Diwali, do 4 things without fail, get a young look...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.