Join us  

सकाळी ऑफीसला जाताना झटपट तयार व्हायचंय? ४ टिप्स, घाईघाईत आवरुनही दिसाल सुंदर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 9:16 AM

4 Easy Simple Make up Tips : कमीत कमी वेळात लूक चांगला करण्यासाठी...

ऑफीसला जाताना किंवा बाहेर जाताना बरेचदा आपल्याला खूप घाई असते. मग घाईगडबडीत आपण घरातलं सगळं आवरतो, बॅगमध्ये सोबत जे घ्यायचं आहे तेही घेतो. पण स्वत:चं नीट आवरण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ राहत नाही. मग बाहेर जाताना आपण टापटीप असलं पाहिजे या संकल्पनेला हरताळ फासला जातो आणि आपण नीटनेटके न दिसता गबाळे दिसतो. पण झटपट आवरण्याच्या काही सोप्या ट्रिक्स असतात. त्या आपल्याला माहित असतील तर आपण कमी वेळातही सुंदर दिसू शकतो. त्यासाठी नेमकं काय करायचं याविषयी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कपड्यांपासून ते हेअरस्टाईल आणि मेकअपपर्यंतच्या अनेक गोष्टी झटपट होतात आणि कमीत कमी वेळात आपला लूक चांगला होण्यास मदत होते (4 Easy Simple Make up Tips). 

१. कपड्यांबाबत आधीच विचार करुन ठेवा

कपडे कोणते घालायचे याबाबत आधीच नियोजन केलेले असेल तर कपड्यांची निवड करण्यात फार वेळ जात नाही. आपल्याला ऑफीसला किंवा बाहेर जाताना कोणते कपडे घालायचे याबाबत नियोजन असेल तर ऐनवेळी कपडे धुतलेले नाहीत, कपड्यांना इस्त्री नाही अशा समस्या उद्भवत नाहीत. तसेच या कपड्यांवर कोणते घड्याळ किंवा दागिने घालायचे याचाही आधीच विचार करुन ठेवावा. 

२. स्कीन केअर रुटीन थोडे लहान करा

अनेकदा मेकअप करताना आपण चेहऱ्याला मॉईश्चरायजर, टोनर, क्लिंजर, हायलायटर, सीसी किंवा बीबी क्रिम, फाऊंडेशन असे वेगवेगळे प्रकार लावतो. पण घाई असते तेव्हा हे सगळे लावत न बसता क्लिंजर, टोनर आणि मॉईश्चरायजर इतक्याच गोष्टी लावाव्यात. 

३. सोपी हेअरस्टाईल निवडा 

घाईत असताना कोणतीतरी अवघड हेअरस्टाईल निवडण्यापेक्षा सोपी हेअरस्टाईल निवडणे केव्हाही सोयीचे असते. अशावेळी आपण वेणी घालणे, एक साधासा बो बांधणे किंवा केस चक्क मोकळे सोडणे असे काहीही करु शकतो. हेअरस्टाईलमध्ये बराच वेळ जाण्याची शक्यता असते, पण सोपी हेअरस्टाईल केली तर कमी वेळात आपले काम पटकन होते.  

(Image : Google)

४. बोटांच्या ऐवजी मेकअप करायला स्पंजचा वापर करा

मेकअपची सगळी प्रॉडक्ट चेहऱ्यावर नीट बसावीत यासाठी बोटांचा वापर न करता स्पंजचा वापर करुन मेकअप करा. स्पंजमुळे तुमचा लूक चांगला होण्यास मदत होईल. अनेकदा आपण घाईत ब्रश वापरतो मात्र त्यामुळे मेकअप एकसारखा न होता तो पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो स्पंजचा वापर करावा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्स