Join us  

फक्त ४ पदार्थ आहारात योग्य प्रमाणात घ्या, केसांच्या सगळ्या तक्रारींवर रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 1:14 PM

Diet Tips For Hair Care: बहुतांश जणांना सध्या केसांच्या अनेक तक्रारी छळत आहे. केसांचं हे सगळं दुखणं थांबवायचं असेल, तर आहारात थोडा बदल करा... केस वाढतील छान आणि राहतील काळेभाेर, चमकदार..

ठळक मुद्देआहारातून केसांना अधिकाधिक पोषण कसं मिळेल, यासाठी कोणते अन्नपदार्थ खाण्याची गरज आहे आणि ते किती प्रमाणात घ्यावेत, याविषयीची ही माहिती.

केसांसंदर्भात काहीही तक्रार नाही, असं सांगणारी स्त्री किंवा पुरुष आता क्वचितच एखादा आढळून येईल. प्रत्येक जण केसांच्या बाबतीत असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या तक्रारीने हैराण आहे. कुणाचे केस खूपच गळत (hair fall) आहेत, तर कुणाच्या केसांमध्ये खूपच कोंडा (dandruff) आहे. कुणाचे केस अगदीच कोरडे आणि निस्तेज (dry hair and hair split) झाले आहेत तर कुणी अकाली केस पांढरे (gray hair) हाेण्यामुळे वैतागले आहेत. केसांच्या बाबतीत तुमची अशी कोणतीही समस्या असेल तरी आहारात हा थोडासा बदल करून बघा. केसांचं आरोग्य सुधारण्यात नक्कीच मदत होईल.(How to reduce hair fall) 

 

आजकाल आपला आहार खूप जास्त बदललेला आहे. काही तरी पौष्टिक पोटात जावं यासाठी खाण्यापेक्षा आजकाल बरेच जण पोटात काहीतरी ढकलण्यासाठी किंवा मग केवळ रसनातृप्ती करण्यासाठी खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याचाच परिणाम आरोग्यावर होत आहे. केसांना व्यवस्थित पोषण मिळत नाही. शिवाय प्रदुषण, केमिकल्स असणारी वेगवेगळी हेअर प्रोडक्ट्स यामुळेही केसांच्या तक्रारी वाढत आहेत. म्हणूनच आहारातून केसांना अधिकाधिक पोषण कसं मिळेल, यासाठी कोणते अन्नपदार्थ खाण्याची गरज आहे आणि ते किती प्रमाणात घ्यावेत, याविषयीची ही माहिती. ही माहिती इन्स्टाग्रामच्या rashichowdhary या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

केसांच्या चांगल्या वाढीसाठी योग्य आहार१. प्रोटीन्सदररोज शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन्स जाणं हे आपल्या तब्येतीच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहेच, पण केसांच्या चांगल्या वाढीसाठीही ते खूपच गरजेचं आहे. पण बऱ्याच जणांना प्रोटीन्स पचतातच असं नाही. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवलं तर अनेक जणांना ब्लोटींग, अपचन असा त्रास होतो. असा त्रास होत असेल तर काही आयुर्वेदिक उपचार करून शरीराच्या आतल्या भागाची, पचनक्रियेची शुद्धी करून घ्या आणि त्यानंतर प्रोटीन्सचं सेवन थोडं थोडं वाढवा.

 

२. व्हिटॅमिन बी १२केसांच्या निरोगी वाढीसाठी अत्यावश्यक असणारा हा आणखी एक पदार्थ. ज्या लोकांचे केस पातळ असतात किंवा खूप गळतात त्या बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते.

हेअर कलर किंवा डाय करताना त्वचेवर काळे डाग पडतात? ३ उपाय, त्वचेवरचा रंग होईल चटकन साफ

१८ वर्षांवरील व्यक्तींना एका दिवशी २.४ मायक्रोग्रॅम्स एवढ्या व्हिटॅमिन बी १२ ची गरज असते. आहारातलं हे प्रमाण योग्य ठेवलं तर नक्कीच केसांच्या अनेक समस्या कमी होतील.

 

३. लोहशरीरातलं लोह कमी झालं की ॲनिमियाचा त्रास सुरू होतो. त्यामुळे आहारातलं लोहाचं प्रमाण नेहमी योग्यच हवं. केसांसाठीही ते गरजेचंच आहे. दररोज वेगवेगळ्या अन्नपदार्थांमधून ३० mg लिक्विड आयर्न पोटात जाणं गरजेचं आहे. 

 

४. थायरॉईडकेस गळण्याची समस्या खूपच वाढली असेल आणि मागच्या अनेक दिवसांपासून कायम असेल तर एकदा थायरॉईडची तपासणी नक्कीच करून घ्या.

केस गळणं खूपच वाढलं? फक्त ३ पदार्थ करतात केसांवर जादू, लवकरच केस होतील मजबूत- दाट

कारण केस गळण्याची समस्या थायरॉईडवरही अवलंबून असते. थायरॉईड संतुलित ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य सल्ला आणि औषधोपचार घेणे उत्तम.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीअन्नआहार योजना