Lokmat Sakhi >Beauty > डाएटमध्ये करा ४ पदार्थांचा समावेश, चेहरा दिसू लागेल तरुण - सुरकुत्या गायब...

डाएटमध्ये करा ४ पदार्थांचा समावेश, चेहरा दिसू लागेल तरुण - सुरकुत्या गायब...

4 Best Anti-Aging Foods to Look Younger : चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा, सुरकुत्या लपवण्यासाठी आता मेकअपची गरज नाही, करा ४ पदार्थांचा समावेश, एजिंगच्या खुणा - सुरकुत्या होतील नाहीशा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 08:19 PM2023-10-18T20:19:46+5:302023-10-18T20:34:14+5:30

4 Best Anti-Aging Foods to Look Younger : चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा, सुरकुत्या लपवण्यासाठी आता मेकअपची गरज नाही, करा ४ पदार्थांचा समावेश, एजिंगच्या खुणा - सुरकुत्या होतील नाहीशा...

4 Foods That Reduce Wrinkles, 4 Best anti aging foods younger looking skin | डाएटमध्ये करा ४ पदार्थांचा समावेश, चेहरा दिसू लागेल तरुण - सुरकुत्या गायब...

डाएटमध्ये करा ४ पदार्थांचा समावेश, चेहरा दिसू लागेल तरुण - सुरकुत्या गायब...

आजकाल बदललेल्या लाईफस्टाईलचा परिणाम जसा आरोग्यावर होतो आहे, तसाच तो आपल्या त्वचेवर, केसांवरही दिसून येत आहे. त्यामुळेच तर कमी वयातच केस पांढरे होणे, केस गळती, त्वचेवर पिंपल्स येणे किंवा चेहरा अकाली सुरकुतलेला दिसणे अशा तक्रारी बहुतांश लोकांना जाणवू लागल्या आहेत. अवघ्या पंचविशीतच अनेक जणींच्या डोळ्याभोवती किंवा ओठांच्या आजूबाजुला असणाऱ्या भागात अगदी बारीक सुरकुत्या (4 foods you must eat often for wrinkle-free skin) दिसू लागतात. त्याला आपण फाईन लाईन्स म्हणतो(What food removes facial wrinkles?).

आपला चेहरा हा तजेलदार, पिंपल्स फ्री, सुरुकुत्या (4 Anti-Aging Foods You Must Try for Youthful, Glowing Skin) नसलेला असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र यासाठी पौष्टीक आहार, व्यायामही तितकाच गरजेचा असतो. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू डोकं वर काढू लागते.सहाजिकच चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी महिला बाजारातील अनेक केमिकलयुक्त क्रिमचा वापर करतात. या केमिकल्सचा त्वचेवर हळूहळू दुष्परिणाम होऊ शकतो. त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या निर्माण होतात. एकदा तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या की फाईन लाईन्स आणि इतर समस्याही वाढू लागतात. त्यामुळे चेहऱ्यावरच्या या वाढत जाणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये काय खातो याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. जर आपण आपल्या डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश केला तर नक्कीच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत ते पाहूयात(4 Anti-Aging Foods You Should Be Eating Every Day).

त्वचेवरील एजिंगच्या खुणा, सुरकुत्या, बारीक रेषा नाहीशा करण्यासाठी डाएटमध्ये कोणते पदार्थ खावेत ?  

१. पपई :- 

पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आपल्या त्वचेची लवचिकता सुधारू शकतात. पपईचा रोजच्या डाएटमध्ये   समावेश केल्याने त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत होऊ शकते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणांत असते. पपईमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा  यांसारख्या वृद्धत्वाच्या खुणांना येण्यापासून रोखण्यास मदत करते. 

वजन कमी करताना सारखी भूकभूक होते ? खा ६ गोष्टी, भूक भागेल आणि वजन वाढणार नाही...

२. पालक :- 

पपई प्रमाणेच, पालकसुद्धा हायड्रेटिंग आणि अँटिऑक्सिडंट्स समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, के, ल्युटीन, मॅग्नेशियम आणि हेम आयर्न भरपूर प्रमाणात असते. या हिरव्या पालेभाजीत असणाऱ्या व्हिटॅमिन सी या घटकामुळे आपल्या शरीरातील कोलेजन उत्पादन वाढवते ज्यामुळे आपली त्वचा मजबूत आणि गुळगुळीत होते. याचबरोबर त्वचेवर येणाऱ्या एजिंगच्या खुणांना कमी करण्यास मदत करते. 

सुंदर त्वचेसाठी आता पार्लरमध्ये का जायचं ? सोप्या ५ गोष्टी करा फॉलो, घरीच मिळवा पार्लरसारखी ग्लोइंग त्वचा...

३. लहान बेरीज फळे :- 

लहान लहान बेरीज फळे त्वचेवरील एजिंग रोखण्यास मदत करतात. रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या बेरी त्यांच्यात असणाऱ्या  अँटिऑक्सिडंट या महत्वाच्या घटकांसाठी ओळखल्या जातात. ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचा वृद्धत्वविरोधी घटकहा फार मोठ्या प्रमाणात असतो.  त्वचेतील कोलेजन या घटकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही लहान लहान फळं खाणे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. 

ओपन पोर्समुळे चेहरा सतत डल, काळपट दिसतो ? ओपन पोर्स नैसर्गिकरित्या बंद करण्याचे ४ सोपे घरगुती उपाय...

४. डाळिंब :- 

डाळिंब खाणे हे शरीरासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते त्याचबरोबर रक्ताभिसरणाची प्रक्रियाही सुरळीत चालते. त्वचेतील बिघडलेल्या पेशींची दुरुस्ती होण्यास मदत होते. हे अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांवर कार्य करते आणि  त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

Web Title: 4 Foods That Reduce Wrinkles, 4 Best anti aging foods younger looking skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.