Lokmat Sakhi >Beauty > डास चावल्याने प्रचंड खाज सुटली? पुरळमुळे त्वचा लाल पडली? ४ उपाय, स्किन होईल क्लिअर

डास चावल्याने प्रचंड खाज सुटली? पुरळमुळे त्वचा लाल पडली? ४ उपाय, स्किन होईल क्लिअर

4 home remedies for mosquito bites and itches डास चावल्याने सतत स्किन खाजवून लाल पडते, वेळीच हे उपाय करा, स्किनची समस्या होईल कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 03:46 PM2023-04-18T15:46:27+5:302023-04-18T15:47:04+5:30

4 home remedies for mosquito bites and itches डास चावल्याने सतत स्किन खाजवून लाल पडते, वेळीच हे उपाय करा, स्किनची समस्या होईल कमी..

4 home remedies for mosquito bites and itches | डास चावल्याने प्रचंड खाज सुटली? पुरळमुळे त्वचा लाल पडली? ४ उपाय, स्किन होईल क्लिअर

डास चावल्याने प्रचंड खाज सुटली? पुरळमुळे त्वचा लाल पडली? ४ उपाय, स्किन होईल क्लिअर

उन्हाळ्यात मच्छरांचा वावर वाढतो. हे मच्छर रात्रीच्या समयी बाहेर येतात, व मनुष्याला त्रास देतात. यासह त्वचेचा चावा घेऊन रक्त शोषून घेतात. यामुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात. डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार आरोग्यासाठी घातक ठरतात. मच्छर त्वचेवर चावल्यानंतर पुरळ उठते.

पुरळांना खाजवल्यानंतर ते आकाराने मोठे होतात, व स्किनवर रॅशेस उठतात. जर पुरळ, व खाज कमी करायची असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे त्वचेवरील फोडीचा आकार कमी होईल, व रेड रॅशेसमुळे त्वचेवर जळजळ होणार नाही. यासह इतर गंभीर आजार होण्याचा धोकाही कमी होईल. त्यामुळे मच्छर चावल्यानंतर हे उपाय करून पाहा. या उपायांमुळे पुरळांची समस्या कमी होईल. व खाजही सुटणार नाही(4 home remedies for mosquito bites and itches).

मच्छर चावल्यानंतर पुरळ व रॅशेसवर हे उपाय करून पाहा..

कोरफड

कोरफडीचा थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहे.  एलोवेरा जेल थेट प्रभावित भागात लावा. कोरफडीचा वापर पुरळांवर केल्याने खाज सुटणे, सूज येणे या समस्येपासून आराम मिळेल. पुरळांवर हा एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.

तुळस - गुलाब पाणी आणि ग्लिसरीन, उन्हाळयात त्वचेच्या सर्व समस्यांवर सोपा आणि मस्त उपाय, करुन तर पाहा

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा त्वचेवर लावल्याने पुरळांमुळे होणारी खाज कमी होईल. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा व पाणी मिसळून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट प्रभावित जागेवर लावा. १० मिनिटानंतर थंड पाण्याने पेस्ट धुवून काढा.

चेहरा काळवंडलाय? टॅनमुळे चेहरा खराब दिसतो? दूध - साखरेचा बनवा ब्राईटनिंग जेल, १० मिनिटात निखळ त्वचा

टी ट्री तेल

टी ट्री ऑईल हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे, जे डास चावल्यामुळे होणारी खाज आणि सूज कमी करण्यास मदत करते. टी ट्री ऑइलचे काही थेंब नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा, व प्रभावित भागात लावा. याने खाज व पुरळची समस्या कमी होईल.

ओटमील

ओटमीलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहे. जे डासांच्या चावण्यामुळे होणारी खाज आणि सूज कमी करते. ओटमीलमध्ये पाणी घालून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. १० मिनिटानंतर पेस्ट थंड पाण्याने धुवा.

Web Title: 4 home remedies for mosquito bites and itches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.