आपल्या शरीराला ज्याप्रमाणे प्रोटीन्सची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या केसांनाही प्रोटीन्स मिळण्याची आवश्यकता असते. मात्र आपल्याला याची कल्पना नसल्याने आपण केसांना प्रोटीन मिळावे म्हणून वेगळे काही प्रयत्न करत नाही. पण केसांची चांगली वाढ व्हावी, ते दाट व्हावेत आणि दिर्घकाळ काळेभोर राहावेत यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. आपले केस हे मुळातच प्रोटीन्सपासून तयार झालेले असतात आणि त्याची कमतरता झाल्यास ते रुक्ष आणि निर्जीव दिसायला लागतात. केसांचा पोत सुधारावा किंवा त्यांना पोषण मिळावे यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या स्पा किंवा प्रोटीन ट्रिटमेंट घेतो. पण यासाठी बराच पैसा आणि वेळ खर्च होतो. त्यापेक्षा घरच्या घरी काही नैसर्गिक पद्धतींनी प्रोटीन ट्रिटमेंट कशी करता येईल पाहूया (4 home remedies for natural protein treatment to hairs)...
१. दुधाचा हेअर मास्क
१ कप दुधात १ मोठा चमचा कोरफडीची जेल आणि १ मोठा चमचा गुलाब पाणी घालायचे. हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आणि मग ते केसांवर लावायचे. साधारण ३० ते ४० मिनीटे हे केसांवर तसेच ठेवायचे आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवून टाकायचे. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केसांना प्रोटीन मिळण्यास मदत होईल.
२. दह्याचा हेअर मास्क
दह्यामध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन असते हे आपल्याला माहित आहे. वाटीभर दह्यात लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण केसांना लावावे. साधारण ४० मिनीटे हा मास्क केसांना लावून ठेवावा. त्यानंतर केस धुवून टाकावेत. दही थंड असल्याने शक्यतो हा मास्क दुपारच्या वेळी लावल्यास सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवणार नाही.
३. बदामाचं तेल
बदाम हे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असतो. बाजारात हे तेल अगदी सहज उपलब्ध असते. या तेलाने १० मिनीटे केसांना मालिश करायची आणि १० मिनीटे हॉट टॉवेल ट्रीटमेंट द्यायची. यामुळे तेल केसांत चांगले मुरते आणि केसांना प्रोटीन मिळण्यास मदत होते.
४. केळ्याचे हेअर मास्क
आपण केस मुलायम आणि छान व्हावेत यासाठी केसांना हेअर मास्क लावत असतो. केळं स्मॅश करुन त्यामध्ये ओटसची बारीक पावडर घालायची. ओटसमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असल्याने मास्कबरोबरच केसांच्या मुळाशी स्क्रब म्हणूनही याचा चांगला उपयोग होतो. साधारण ३० मिनीटे हा मास्क ठेवून नंतर केस धुवून टाकावेत.