Lokmat Sakhi >Beauty > पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

4 Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally : डाय आणि मेहेंदीशिवाय काळे केस हवेत तर, आहारात 'हे' ४ पदार्थ हवेतच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 09:59 AM2024-09-10T09:59:38+5:302024-09-10T10:00:58+5:30

4 Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally : डाय आणि मेहेंदीशिवाय काळे केस हवेत तर, आहारात 'हे' ४ पदार्थ हवेतच..

4 Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally | पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे (Hair care Tips). पूर्वी केस वयानुसार पांढरे होत असे पण आता कमी वयातही लोकांचे केस पांढरे आणि निर्जीव दिसू लागले आहेत. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात (Hair Health). केसांची निगा फक्त बाहेरून नसून, खोलवर पोषण देण्यासाठी आहारातही काही बदल करणं अत्यंत गरजेच आहे.

शरीरातील पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे केस आणि त्वचेचा तेज कमी होत जातो. आपल्या आहारातून जर शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नसतील तर, ५ सुपरफुडस खा. या सुपरफुडसचा आहारात समावेश केल्याने केस काळे, दाट  आणि चमकदार दिसतात. कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने केसांची योग्य वाढ होईल? पाहा(4 Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally).

केसांच्या वाढीसाठी कोणते पदार्थ खावे?

कडीपत्ता

कडीपत्ता फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. कडीपत्त्यात  अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, बी आणि सी सारखी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखी खनिजे असतात. ज्यामुळे केस पांढरे होत नाही. शिवाय केस गळतीही रोखली जाते.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि कॉपर असते. ज्यामुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते. यासह  केसांची मुळे घट्ट होतात. व्हिटॅमिन सी केसांना निरोगी चमक देण्यासही मदत करते. जर आपल्याला केस दाट आणि चमकदार हवेत तर, स्ट्रॉबेरी नक्की खा.

व्यायामाला वेळ नाही - तोंडाचाही ताबा सुटतो? ४ स्मार्ट गोष्टी करा; दिसाल सुडौल - राहाल कायम फिट

शेंगदाणे

जर आपल्याला केस मूळापासून मजबूत करायचे असतील तर, आहारात शेंगदाण्यांचा समावेश करा. शेंगदाणे प्रथिने, व्हिटॅमिन ई, तांबे, मँगनीज, बायोटिन, फोलेट यांचा चांगला स्रोत आहे. जे केसांचे पोषण करते, आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

आवळा

व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. आवळा शरीरातील चयापचय क्रिया दुरुस्त करते. यासह शरीरात तयार होणारे DHT हार्मोनचे सामान्य स्तर राखण्यास मदत करते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. त्यात व्हिटॅमिन सी तसेच इतर अँटिऑक्सिडंट्स असतात जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Web Title: 4 Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.