त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण विविध स्कीन केअर ट्रिटमेंट्स करतो. आजूबाजूला सतत धूळ उडत असते. तसेच आपण तेलकट-तळलेले पदार्थही सारखे खातो. (4 home remedies to remove whiteheads, your face will always look clean )त्यांचाही त्वचेवर परिणाम होतो. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर, ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी चेहरा धुत राहणे, चेहर्याला पोषण देणारे उपाय करणे गरजेचे असते. (4 home remedies to remove whiteheads, your face will always look clean )चेहरा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते. विविध त्वचा समस्यांमधील एक म्हणजे ब्लॅकहेड्स.
जवळपास सगळ्यांनाच हा त्रास होतो. त्वचेच्या छिद्रांमध्ये माती अडकल्याने तसेच त्वचा अति तेलकट झाल्याने लहाने काळे-काळे डाग उठतात. (4 home remedies to remove whiteheads, your face will always look clean )ते नाकावर गालाजवळ अगदी भडक दिसतात. आपण ब्लॅकहेड्स दिसल्या दिसल्या काढून टाकतो. मात्र आपण व्हाईटहेड्सकडे दुर्लक्ष करतो. कारण ते पटकन दिसून येत नाहीत.
चेहर्यावरील हे हेड्स दिसायला घाण दिसतातच पण त्यांच्यामुळे त्वचेचे नुकसानही होते. याबद्दल हेल्थलाईन तसेच हेल्थ डॉटकॉमसारख्या साइट्सवरती माहिती उपलब्ध आहे. ब्लॅकहेड्सबरोबर व्हाईटहेड्स काढणेही महत्त्वाचे असते. हे काही घरगुती उपाय आहेत, ते करून बघा.
१. वाफ घेणे
त्वचेच्या छिद्रांमध्ये माती, धूळ तसेच तेल अडकते. त्याचप्रमाणे या छिद्रांमध्ये डेडस्किनही अडकते. हे अडकलेले घटक चिकट होतात. त्यांच्यामुळे त्वचेला खाजही येत राहते. चेहरा तेलकट होतो. वाफ घेतल्याने अडकलेले घटक चेहर्यावरील छिद्रांपासून वेगळे होतात आणि साध्या फडक्यानेही काढता येतात. त्वचाही स्वच्छ होते.
२. फेस पॅक
चमचाभर हळद घ्या. त्यामध्ये मध घाला. तसेच थोडं गुलाब पाणी घाला. ते मिश्रण छान एकजीव करून घ्या. ते चेहर्याला लावून ठेवा. २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. रोज हा पॅक चेहर्याला लावा. महिन्याभरानंतर व्हाइटहेड्स तयार होणंच बंद होऊन जाईल.
३. चेहरा झाका
उन्हामधून फिरायची वेळ आली की, चेहरा झाकून घ्यायचा. स्कार्फ वापरा, रुमाल किंवा मास्क वापरा. चेहरा झाकला की चेहर्यावर माती बसत नाही. प्रदूषणाचा त्रासही होत नाही.
४. सातत्याने काळजी घेणे
चेहरा सारखा धुवायचा. चेहरा सारखा चिकट होत असेल तर, तुमची त्वचा ऑयली आहे आणि ऑयली त्वचेवर हे व्हाईटहेड्स जास्त लवकर तयार होतात. त्यामुळे चांगल्या साबणाने किंवा फेसवॉशने चेहरा काही तासांच्या अंतराने धुवायचा.