Lokmat Sakhi >Beauty > २ चमचे दह्यात मिसळा ४ गोष्टी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, मेकअपचीही गरज भासणार नाही

२ चमचे दह्यात मिसळा ४ गोष्टी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, मेकअपचीही गरज भासणार नाही

4 Homemade Curd Face Packs For Different Skin Types दह्याच्या ४ फेस पॅकचे पाहा आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 03:06 PM2023-06-06T15:06:05+5:302023-06-06T15:06:54+5:30

4 Homemade Curd Face Packs For Different Skin Types दह्याच्या ४ फेस पॅकचे पाहा आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल चमकदार

4 Homemade Curd Face Packs For Different Skin Types | २ चमचे दह्यात मिसळा ४ गोष्टी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, मेकअपचीही गरज भासणार नाही

२ चमचे दह्यात मिसळा ४ गोष्टी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, मेकअपचीही गरज भासणार नाही

उन्हाळ्याच्या दिवसात आहारात दह्याचा वापर जास्त होतो. दह्याचे अनेक प्रकार केले जातात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. दही फक्त आरोग्यासाठी नाही तर, स्किन व केसांसाठी देखील उपयुक्त ठरते. चेहऱ्यावर दही लावल्याने अनेक फायदे होतात. दह्यात A, D, B-2, B-5, B-12, प्रोटीन, झिंक, लॅक्टिक ऍसिड, प्रोबायोटिक्स इत्यादी जीवनसत्त्वे असतात. हे सर्व घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

दही त्वचेची टॅनिंग, घाण व डेड स्किन काढण्यास मदत करते. दह्याने त्वचा एक्सफोलिएट होते. ज्यामुळे स्किनवर नैसर्गिक ग्लो येतो. त्वचेच्या निगडीत समस्या सोडवण्यासाठी, आपण दह्यापासून ४ फेस पॅक बनवू शकता(4 Homemade Curd Face Packs For Different Skin Types).

दही आणि मध

चेहऱ्यावर दही आणि मध मिसळून लावल्यास नैसर्गिक ग्लो येतो. यासाठी एका वाटीत दोन चमचे दही घ्या, त्यात एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर व मानेवर लावा. २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायामुळे त्वचा चमकेल. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ

दही आणि हळद

एका वाटीत दही घ्या, त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हळदीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करतात. ही पेस्ट चेहरा व मानेवर लावा. २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर चमक येईल, तसेच पिंपल्सचीही समस्या सुटेल.

५ रुपयांची तुरटी केस आणि स्किनसाठी ठरते रामबाण उपाय, पाहा भन्नाट वापर व फायदे

दही आणि ओट्स

वजन कमी करण्यासाठी आपण ओट्सचा आहारात समावेश करतो. दही आणि ओट्सपासून आपण फेस स्क्रब बनवू शकता. या फेस स्क्रबमुळे डेड स्किन व टॅनिंग दूर होईल. यासाठी एका वाटीत दोन्ही गोष्टी समप्रमाणात घेऊन मिक्स करा. व ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. पेस्ट लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा, व १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा.

घामामुळे मेकअप बिघडतो? काजळ पसरते? ५ टिप्स, कितीही घाम आला तरी मेकअप बिघडणार नाही

दही आणि बेसन

बेसनाचे अनेक फेस पॅक केले जातात. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. यासाठी एका वाटीत दही व बेसन घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, पेस्ट कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा. उन्हामुळे चेहऱ्यावर टॅनिंग आणि डाग दिसू लागले असतील तर, फेस पॅकमुळे निघून जातील. 

Web Title: 4 Homemade Curd Face Packs For Different Skin Types

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.