Lokmat Sakhi >Beauty > फक्त 'हे' ४ नैसर्गिक पदार्थ वापरा, पांढरे झालेले केस काही मिनिटांत होतील काळेभोर...

फक्त 'हे' ४ नैसर्गिक पदार्थ वापरा, पांढरे झालेले केस काही मिनिटांत होतील काळेभोर...

4 Homemade natural hair dyes for grey hair : 4 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals : Homemade Natural Hair Dye for Grey Hair : Home Remedies for Gray Hair : केसांना नैसर्गिक पद्धतीने काळा रंग येण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करायचा ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 15:39 IST2025-02-12T15:26:57+5:302025-02-12T15:39:37+5:30

4 Homemade natural hair dyes for grey hair : 4 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals : Homemade Natural Hair Dye for Grey Hair : Home Remedies for Gray Hair : केसांना नैसर्गिक पद्धतीने काळा रंग येण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करायचा ते पाहा...

4 Homemade natural hair dyes for grey hair 4 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals Home Remedies for Gray Hair | फक्त 'हे' ४ नैसर्गिक पदार्थ वापरा, पांढरे झालेले केस काही मिनिटांत होतील काळेभोर...

फक्त 'हे' ४ नैसर्गिक पदार्थ वापरा, पांढरे झालेले केस काही मिनिटांत होतील काळेभोर...

वाढत्या वयोमानानुसार डोक्यावरचे केस पांढरे होणं हे खूपच कॉमन आहे. एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. डाय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रंग (4 Homemade natural hair dyes for grey hair) लावल्यानंतर लगेच केस काळे होत असले तरी ते पुन्हा पांढरे व्हायला वेळ ( 4 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals) लागत नाही. पांढरे झालेले केस कुणालाही आवडत नाही. त्यातही जर फारच कमी वयात केस पांढरे झाले असतील तर आपण केस काळे करण्यासाठी अनेक उपाय करतोच(Home Remedies for Gray Hair).

केस पुन्हा काळे करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो, या उपायांमध्ये आपण केसांना मेहेंदी, रंग किंवा डाय लावतो. परंतु हे सगळे उपाय करून देखील त्यांचे परिणाम फारसे दिवस टिकून राहत नाही. यासाठी केसांना पुन्हा काळा रंग येण्यासाठी अशा आर्टिफिशियल उपायांचा वापर हा तात्पुरता असतो. यासाठीच केसांसाठी असे वारंवार (Homemade Natural Hair Dye for Grey Hair) तात्पुरते आर्टिफिशियल उपाय करण्यापेक्षा एकच ठोस नैसर्गिक उपाय करणे कधीही चांगले. यासाठी पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मेहेंदी, डाय किंवा आर्टिफिशियल रंगाचा वापर करण्यापेक्षा किचनमधील हे ५ नैसर्गिक पदार्थच ठरतील फायदेशीर. केसांना नैसर्गिक पद्धतीने काळा रंग येण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करायचा ते पाहूयात.   

केसांना नैसर्गिक पद्धतीने काळा रंग येण्यासाठी... 

१. आवळा पावडर :- आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि टॅनिन भरपूर प्रमाणात असते, जे केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी मदत करतात. याचबरोबर, आवळ्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या मुळांचे रक्षण करुन केसांना मजबुती देतात. केसांसाठी आवळा पावडरचा वापर करताना आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. ही तयार पेस्ट तुमच्या केसांना आणि स्काल्पला नीट लावा. त्यानंतर ४५ ते ६० मिनिटे तसेच केसांवर राहू द्या. मग कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.

२. कॉफी :- कॉफीमध्ये गडद रंगद्रव्ये असतात जी केस काळे करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये असलेले कॅफिन केवळ केस काळे करत नाही तर केसांच्या वाढीस देखील चालना देते. केसगळतीसाठी कारणीभूत असलेल्या DHT संप्रेरकाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. केस काळे करण्यासाठी, पाणी गरम करुन त्यात कॉफी घालून कॉफीचे पाणी तयार करून घ्या आणि ते पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर हे कॉफीचे पाणी तुमच्या नेहमीच्या कंडिशनरमध्ये  मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि २० ते ३० मिनिटे तसेच राहू द्या. मग केस नीट स्वच्छ धुवा.  

चेहऱ्यावर सतत एलोवेरा जेल चोपडताय? वाढू शकतात स्किन प्रॉब्लेम्स कारण...

३. मेथी दाणे :- मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर मेथी दाण्यांमध्ये इतरही पोषक घटक असतात. हे पोषक घटक स्काल्पचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि केसगळती नियंत्रित करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर या भिजलेल्या मेथी दाण्यांची पेस्ट तयार करा आणि त्यात आवळा पावडर व गरजेनुसार पाणी मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांना आणि स्काल्पला लावा. सुमारे एक तास ते तसेच राहू द्या, नंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

कोरडे-झाडूसारखे रखरखीत झालेले केस होतील मऊ, ‘हा’ हेअरमास्क करतो केसांवर जादू एका दिवसात...

४. कडीपत्ता :- कडीपत्त्यांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि इतर आवश्यक प्रथिने फार मोठ्या प्रमाणांत असतात. ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ होते. मूठभर कढीपत्ता खोबरेल तेलात काळा होईपर्यंत उकळवा. त्यानंतर हे खोबरेल तेल थंड होऊ द्या. हे थंड तेल स्काल्प आणि केसांना लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी केस स्वच्छ धुवा.

Web Title: 4 Homemade natural hair dyes for grey hair 4 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals Home Remedies for Gray Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.