तुळस. आपल्या दारात असतेच. अनेकजण पुजा करतात. ग्रामीणच नव्हे तर शहरात देखील दारासमोर किंवा खिडकीत तुळस घरोघर असते. भारतात तुळशीला अधिक महत्व आहे. हजारो वर्षांपासून अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.
मात्र, तुळशीचा केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठीही वापर होतो. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे पुरळ, संक्रमण, मुरूम इत्यादी बरे करण्यास मदत करतात. आपल्याला या समस्येपासून सुटका हवी असल्यास, या प्रकारे तुळशीचा फेसमास्क बनवा, याच्या वापरामुळे चेहऱ्यावर नितळ व ग्लो येईल(4 Homemade Tulsi Face Masks To Get Blemish-Free And Clear Skin).
बटाट्याची भाजी करताना सालं फेकून देता, करा हेअर मास्क-पांढऱ्या होणाऱ्या केसांवर असरदार इलाज
मुरुमांसाठी तुळशीचा फेसमास्क
एका वाटीत २ चमचे तुळशी पावडर घ्या, त्यात थोडे पाणी घालून मिश्रण मिक्स करा. ही पेस्ट त्वचेवर लावून २० मिनिटांसाठी ठेवा. यानंतर सामान्य पाण्याने धुवा. या फेसमास्कमुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी होतील, व त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल.
कोरफड जेल आणि तुळशीचा फेसमास्क
मुठभर तुळशीची पानं घ्या, त्यांना स्वच्छ धुवून त्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीत घ्या, त्यात कोरफड जेल मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आपण हा अँटी फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.
परफ्यूम भसाभसा अंगावर फवारताय? शरीरावर ७ ठिकाणी हलकासा लावा- राहाल दिवसभर फ्रेश-दुर्गंधी गायब
तुळशी, हळद, गुलाबपाणी फेसपॅक
एका वाटीत चमचाभर तुळस पावडर घ्या. त्यात हळद घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. आता त्यात गुलाबपाणी घालून मिश्रणाची पेस्ट तयार करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, व १५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
केस गळतात म्हणून कंटाळलात? मेथीचे तेल करा - केस गळण्याचे टेन्शन नाही...
मध आणि तुळशीचा फेसपॅक
तुळशीची बारीक पाने घ्या, त्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीत घ्या, त्यात मध घालून मिश्रण एकत्र मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.