Join us  

फक्त दोन तासात आणि मोफत ‘हेअर स्मुथनिंग’ करायचंय का? हा घ्या भन्नाट उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 3:04 PM

4 ingredients to straighten hair naturally at home आपल्या किचनमधलेच चार जादूई पदार्थ घ्या आणि बघा केसांवर कशी जादू होते ते..

सध्या ब्युटी ट्रेण्डनुसार महिलावर्ग अनेक उपाय करून पाहतात. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःच्या सौंदर्याला अपडेट करतात. केसांच्या मुळापासून ते पायाच्या नखातील टोकापर्यंत विविध गोष्टी करून पाहतात. हेअर ट्रीटमेंट महाग असूनही महिलावर्गामध्ये खूप लोकप्रिय आहे. हेअर स्मुथनिंग व स्ट्रेटनिंग करण्यासाठी महिलावर्ग खूप खर्च करतात. पण हा खर्च आपल्याला टाळता येईल.

एक रुपये खर्च न करता घरच्या साहित्यांचा वापर करून आपण केसांना स्मूथ व स्ट्रेट करू शकता. काही ब्युटी प्रॉडक्ट्समुळे केसांची समस्या वाढते. पण जर आपण घरच्या साहित्यांचा वापर करून केसांना स्ट्रेटनिंग करू इच्छित असाल तर, या ट्रिकचा नक्की वापर करून पाहा. या ट्रिकमुळे दोन तासात केस सरळ व चमकदार दिसतील(4 ingredients to straighten hair naturally at home).

केस स्ट्रेट करण्यासाठी लागणारं साहित्य

दही

खोबरेल तेल

कपाळावर फार पिंपल्स, चेहरा विचित्र दिसतो? १ उपाय, पिंपल्स होतील कमी

मध

एलोवेरा जेल

अशा पद्धतीने करा हेअर स्ट्रेट

स्ट्रेटनिंग सोल्युशनसाठी, एका वाटीत २ चमचे दही, १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध, १ चमचा कोरफड जेल घ्या. हे मिश्रण एकत्र मिक्स करा. ही तयार पेस्ट केसांच्या मुळांपासून ते केसांच्या लांबीपर्यंत चांगले लावा. व  दोन तासांसाठी तसेच ठेवा, त्यानंतर केस चांगले धुवा.

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

हा उपाय केल्यानंतर केस कंगव्याने विंचरून पाहा. कंगवा सरळ निसटून खाली पडेल. अशा प्रकारे केस मुलायम, स्ट्रेट व चमकदार दिसतील. यामध्ये वापरण्यात येणारे घटक केसांना पोषण देईल. ज्यामुळे केस गळणे, तुटणे व केसांमध्ये कोंडा निर्माण होणे ही समस्या कमी होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. ज्यामुळे केस परफेक्ट दिसतील.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स