आपल्याला नेहमी असे वाटते, की आपण नेहमी तरुण आणि सुंदर दिसावे. आपल्या चेहऱ्यावरून वय लवकर दिसून येऊ नये. आपल्या त्वचेतील सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी स्वतःकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. ज्यामुळे स्किन व इतर समस्या अधिक प्रमाणावर वाढतात. स्किन केअर म्हणजे फक्त चेहरा धुणे नव्हे तर, चेहऱ्याच्या संबंधित समस्या जाणून घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यावर उपचार घेणे हे आहे.
प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या पोतानुसार त्वचेच्या निगडीत समस्या वेगवेगळ्या असतात. अशा काही नकळत आपल्याकडून चुका होतात, ज्यामुळे आपले आहे त्या वयापेक्षा अधिक वय दिसून येते. त्या चुका कोणत्या आहेत ते पाहूयात(4 make-up mistakes that can make you look older).
चुकीची स्किन केअर रुटीन फॉलो करणे
कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नये असे वाटत असेल तर, आपल्या त्वचेनुसार स्किनची योग्य काळजी घ्या. यासाठी दिवसातून किमान २ वेळा चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर टोनर आणि मॉइश्चरायझर लावा.
१ चमचा कोरफड जेलमध्ये मिक्स करा ‘एक’ खास पदार्थ, केस गळत होते हेच विसराल
आठवड्यातून एकदा क्लिनअप आणि महिन्यातून एकदा फेशियल देखील करायला हवे. हे दोन्ही उपाय त्वचेची खोलवर स्वच्छता करतात. ज्यामुळे चेहरा फक्त निरोगी राहत नसून, चमकदार देखील दिसते.
वारंवार प्रॉडक्ट्स चेंज करणे
बाजारात विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादने मिळतात. पण आपल्या चेहऱ्यावर कोणते उत्पादने सूट करतील याची माहिती आपल्याला हवी. यासह आपण वापरात असलेले प्रॉडक्ट्स वारंवार बदलू नये. कोणत्याही गोष्टीचा परिणाम दिसण्यासाठी किमान १ महिना लागतो. जर प्रॉडक्ट्स सूट करत असेल तर, तर त्याला सतत बदलू नका.
त्वचेला एक्सफोलिएट न करणे
त्वचा निरोगी आणि तरुण दिसावी असे वाटत असेल तर, त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्वचा एक्सफोलिएट केल्याने डेड स्किन निघून जातात. ज्यामुळे नवीन पेशी तयार होतात. व मॉइश्चरायझिंग उत्पादने त्वचेमध्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात. त्वचेला आठवड्यातून २ वेळा एक्सफोलिएट करा. यासोबतच त्वचेच्या प्रकारानुसार एक्सफोलिएट करा.
आठवड्यात किती वेळा केस धुणे योग्य? सतत धूत असाल तर किंवा आठवड्यातून एकदाच नहात असाल तर..
सनस्क्रीनचा वापर न करणे
त्वचेसाठी सनस्क्रीन खूप फायदेशीर ठरते. जर आपल्या त्वचेवर सुरकुत्या व बारीक रेषा येऊ नये असे वाटत असेल तर, बाहेर जाताना नियमित सनस्क्रीनचा वापर करा. सनस्क्रीनमुळे त्वचेवर एक थर निर्माण होतो, ज्यामुळे स्किनला धूळ, माती, प्रदुषणाचा त्रास होत नाही.