Join us  

फेशियलनंतर वाफ घेताना हमखास होणाऱ्या ४ चुका, फेशियल करूनही हमखास लागते चेहऱ्याची वाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 9:00 AM

4 Mistakes To Avoid While Steaming After a Facial : फेशियल केल्यानंतर चेहेरा झाकून वाफ घ्यावी. वाफ घेतल्याने चेहेऱ्यावर चांगले परिणाम दिसून येतात पण होणाऱ्या लहान चुका नक्की टाळा.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून स्वत:च्या सौंदर्यासाठी थोडा वेळ काढणं आणि घरच्या घरी का होईना जमेल तितक्या गोष्टी करणं फार महत्त्वाचे असते. चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अधूनमधून चेहऱ्याचे फेशियल करणे आवश्यक असते. फेशियलमुळे आपल्याला सौंदर्याचे अनेक फायदे तर मिळतातच पण त्याचे मानसिक फायदेही होतात. आपली त्वचा निरोगी आणि सुंदर दिसण्यात फेशियलची विशेष महत्वाची भूमिका असते. ठराविक वयानंतर वेळोवेळी फेशियल करणं त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. फक्त आपल्या त्वचेचा प्रकार काय आहे हे समजून काही काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यानुसार आपल्याला फेशियलची निवड करावी लागते. पण, काही वेळा काही लोक फेशियल केल्यानंतर अशा चुका करू लागतात, ज्यामुळे त्यांच्या त्वचेला हानी पोहोचते(What to Know About Facial Steaming).

आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी जितकी आपल्याला आतून काळजी घ्यावी लागते तितकीच त्वचेची काळजी बाहेरून देखील घ्यावी लागते. बाहेरून त्वचा सुंदर दिसण्यासाठी (How To Do Steam After Facial) आपण नेहमी फेशियलचा आधार घेतो. चेहऱ्यावर फेशियल करताना मसाज, क्लीन्झर, टोनर, पिल ऑफ मास्क, डिटॅन मास्क अश्या वेगवेगळ्या क्रीम्स, जेल आणि मास्क वापरले जातात. या सगळ्या बरोबरच फेशियल केल्यानंतर आपल्या चेहेऱ्यावर त्याचे उत्तम परिणाम दिसण्यासाठी वाफ दिली जाते. फेशियलनंतर चेहेऱ्यावर वाफ घेणे महत्वाचे असते पण ही वाफ घेताना होणाऱ्या लहान चुका टाळल्या तर या फेशियलचे चांगले परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतात(4 Mistakes To Avoid While Steaming After a Facial).

फेशियलनंतर वाफ घेताना होणाऱ्या चुका टाळा... 

चूक १ :- चेहरा न धुताच वाफ घेणे. 

फेशियल झाल्यानंतर चेहेऱ्यावर वाफ घेण्यापूर्वी चेहरा सगळ्यांत आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. जर आपण चेहरा स्वच्छ न धुताच तशीच वाफ घेतली तर यामुळे आपली त्वचा खराब होऊ शकते. जर आपल्या चेहेऱ्यावर आधीपासूनच धूळ, माती, किंवा लहान - लहान धूलिकण असतील तर यामुळे चेहेऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. कारण चेहेऱ्यावर धूळ, माती, धूलिकण असताना वाफ घेतल्याने त्वचेची छिद्रे ओपन होऊन त्यात हे धूलिकण जाऊन बसल्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. यामुळेच फेशियलनंतर वाफ घेताना सर्वातआधी चेहरा धुवून घ्यावा. 

यंग, ग्लोइंग स्किनसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, १ चूक पडेल महागात...

चूक २ :- चेहेऱ्यावर मसाज न करताच वाफ घेणे. 

वाफ घेण्यापूर्वी चेहेऱ्यावर आवर्जून क्रिमने मसाज करायला विसरु नका. सगळ्यांतआधी सौम्य अशा मोल्ड क्लींजरने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर  हातांवर माईल्ड मॉइश्चरायझर किंवा कोणतेही सौम्य क्रिम घेऊन त्याने स्किनला मसाज करुन घ्यावा. जर आपण क्रीमने मसाज न करताच वाफ घेतली तर यामुळे आपल्या त्वचेचा पोत खराब होऊन त्वचा रुक्ष, निस्तेज बनू शकते. 

आंघोळीच्या पाण्यांत घाला या पदार्थाचे ३ ते ४ जादुई थेंब, त्वचेत दिसेल इतका सुंदर फरक की...

चूक ३ :- वाफ घेताना वाफेच्या भांड्याच्या अगदी जवळ जाऊन वाफ घेणे. 

आपल्यापैकी बरेचजण वाफ घेताना वाफेच्या भांड्याच्या अगदी जवळ जाऊन वाफ घेण्याचा प्रयत्न करतात, असे करणे टाळावे. अगदी जवळून वाफ घेताना या गरम वाफेचा चटका आपल्या स्किनला लागू शकतो. यासोबतच गरजेपेक्षा गरम वाफ घेतल्याने आपली त्वचा खराब होऊ शकते. यामुळे त्वचेवर रॅशेज, त्वचा लाल होणे, त्वचेतील पेशी खराब होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. चेहेऱ्यावर वाफ घेताना वाफेच्या भांड्यापासून किमान १ फूट तरी लांब राहून वाफ घ्यावी. 

मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

चूक ४ :- वाफ घेण्याच्या स्टिमरची वेळोवेळी स्वच्छता न ठेवणे. 

वाफ घेण्यापूर्वी स्टिमर स्वच्छ आहे ना याची आधी खात्री करुन घ्यावी. वाफ घेण्याआधी स्टिमर पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावा. यासोबतच स्टिमर मधील आधी जुने वापरलेले पाणी फेकून द्यावे. वाफ घेण्यापूर्वी प्रत्येक वापराआधी स्टिमरमध्ये स्वच्छ व चांगले पाणी भरावे. जर आपण स्टिमर न धुता त्यातील त्याच जुन्या वापरलेल्या पाण्याने वाफ घेतली तर यामुळे आपली त्वचा डल व खराब दिसू शकते.

चेहऱ्याला बर्फाने मसाज करता ? पण ४ गोष्टी चुकल्या तर चेहरा दिसतो विद्रूप - त्वचा होते खराब...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी