फेस वॉश हा आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. काही लोकं सामान्य पद्धतीने चेहरा धुतात, तर काही विशेष प्रॉडक्ट्सचा वापर करून चेहरा धुतात. तर अनेक जण दिवसातून ४ ते ५ वेळा चेहरा धुतात. पण अनेकदा चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतरही त्वचा खडबडीत आणि कोरडी दिसू लागते.
ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमांचे डाग, यासह इतर समस्या दिसून येतात. नियमित चेहरा धुतल्यानंतरही त्वचेवर स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स निर्माण होतात. स्किन प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी चेहरा कोणत्या पद्धतीने धुवावा? चेहरा धुताना कोणती चूक टाळावी? चेहरा थंड पाण्याने धुवावे की गरम? याची माहिती घेऊयात(4 Mistakes to Avoid While Washing Your Face).
फेस वॉशची निवड
बहुतांश लोकं चेहरा धुण्यासाठी साबणाऐवजी फेस वॉशचा वापर करतात. पण अनेक फेस वॉशमध्ये केमिकल रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या दिसून येतात. फेस वॉश निवडताना योग्य निवडा, कारण यामुळे आपला चेहरा खराब होण्याची शक्यता जास्त असते.
रोज रात्री न चुकता पाय धुवून झोपा, ५ फायदे - पाण्यात घाला एक चमचा मीठ कारण...
सामान्य पाण्याचा वापर
काही लोकं चेहरा धुण्यासाठी सामान्य पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करतात. चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर टाळावा. गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होऊ लागते, व त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी सामान्य पाण्याचा वापर करा.
वेट वाइप्सचा वापर
अनेकजण चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्सचा वापर करतात. परंतु, यामुळे चेहरा पूर्णपणे स्वच्छ होत नाही. तसेच त्यात केमिकल रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे पॉर्स ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे वेट वाइप्सचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.
फक्त १ कच्चा बटाटा चेहऱ्याला लावा, काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी! बघा योग्य पद्धत
घाणेरड्या टॉवेलचा वापर
स्किन केअरमध्ये केवळ चेहरा धुणेच नाही तर ते पुसणे देखील महत्त्वाचे आहे. चेहरा पुसण्यासाठी आपण टॉवेलचा वापर करतो. पण ते जर घाणेरडे असेल तर? घाणेरड्या टॉवेलमुळे बॅक्टेरिया त्वचेत जातात. ज्यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या वाढू लागतात. चेहरा पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ टॉवेलचा वापर करा.