Lokmat Sakhi >Beauty > केस गळून-गळून खूप पातळ झाले, टक्कल दिसते? वापरा ४ पदार्थ, महिन्याभरात केस होतील जाड-लांबसडक

केस गळून-गळून खूप पातळ झाले, टक्कल दिसते? वापरा ४ पदार्थ, महिन्याभरात केस होतील जाड-लांबसडक

4 Natural ingredients for hair growth Hair Care tips : रासायनिक पदार्थ वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपाय केव्हाही अधिक सोपे आणि फायदेशीर असतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2023 01:19 PM2023-12-08T13:19:47+5:302023-12-08T13:27:49+5:30

4 Natural ingredients for hair growth Hair Care tips : रासायनिक पदार्थ वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपाय केव्हाही अधिक सोपे आणि फायदेशीर असतात...

4 Natural ingredients for hair growth Hair Care tips : Hair thinning and thinning, looking bald? Use 4 ingredients, hair will be thick and long in a month | केस गळून-गळून खूप पातळ झाले, टक्कल दिसते? वापरा ४ पदार्थ, महिन्याभरात केस होतील जाड-लांबसडक

केस गळून-गळून खूप पातळ झाले, टक्कल दिसते? वापरा ४ पदार्थ, महिन्याभरात केस होतील जाड-लांबसडक

थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही आपले केस इतके जास्त गळतात की डोक्यावर टक्कल पडल्यासारखे दिसायला लागते. अशावेळी वेणी, पोनी किंवा आंबाडाही इतका लहान येतो की अशा केसांची कोणतीच हेअरस्टाईल चांगली दिसत नाही. प्रदूषण, आहारातून न मिळणारे पोषण, रासायनिक उत्पादनांचा अतिवापर, ताणतणाव आणि आरोग्याच्या इतर समस्या यांचा केसांवर परीणाम होत असतो. त्यामुळे केसांत एकदा कंगवा घातला तरी केसांचा मोठाच्या मोठा गुंता आपल्या हातात येतो. इतकेच नाही तर केस धुतल्यावर, नुसता हात फिरवला तरी प्रमाणाबाहेर गळतात (4 Natural ingredients for hair growth Hair Care tips). 

असे झाल्यास आपल्याला नेमके काय करावे ते कळत नाही. मग पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस घेण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने केसांवर उपचार करता येऊ शकतात. हे उपाय जास्त महाग नसल्याने आणि त्याचा काही साईड इफेक्ट होत नसल्याने ते केव्हाही जास्त चांगले.  हे उपाय कोणते ते आज आपण पाहणार आहोत.  हे नैसर्गिक पदार्थ केसांना लावल्यास केसांचे पोषण होऊन ते गळण्याचे प्रमाण कमी होते. इतकेच नाही तर या उपायांमुळे केस वाढण्याचीही शक्यता असल्याने काही दिवस नियमित हे उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे.   

(Image : Google)
(Image : Google)

१. कांदा 

नेहमीच्या कांद्यापेक्षा सॅलेडमध्ये वापरण्यात येणाऱ्या लहान आकाराच्या कांद्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असते. यामुळे केसांची संख्या वाढण्यास आणि ते दाट दिसण्यास चांगली मदत होते. त्यामुळे केसांच्या मूळांना कांद्याचा रस लावून ठेवल्यास मुळांचे चांगले पोषण होते.

२. मेथ्या 

मेथ्या हा आहारातील अतिशय उपयुक्त असा पदार्थ असून केसांच्या वाढीसाठीही मेथ्या उपयुक्त ठरतात. या मेथ्यांपासून आपण सिरम, मास्क, स्प्रे असे विविध प्रकार तयार करु शकतो. 

३. रोजमेरी इसेन्शिअल ऑईल

 आठवड्यातून २ ते ३ वेळा रोजमेरी तेलाने केसांना मसाज करा, यामुळे केस दाट आणि लांब होतील.याशिवाय आपण वापरत असलेल्या शाम्पूमध्ये रोजमेरी ऑईलचे काही थेंब मिसळून त्याने हेअर वॉश केल्यास केसांची संख्या वाढण्यास निश्चितच मदत होते. 

४. भृंगराज

भृंगराज ही आयुर्वेदीक वनस्पती असून ती केसांच्या वाढीसाठी फार उपयुक्त असल्याने पूर्वीपासून तिचा वापर केला जात आहे. त्यामुळे केसांना भृंगराज तेल, पावडरीचे मास्क वापरल्यास केस काळे होण्यास, वाढण्यास, पोत सुधारण्यास आणि केसांना चांगला वास येण्यास मदत होते. 


 

Web Title: 4 Natural ingredients for hair growth Hair Care tips : Hair thinning and thinning, looking bald? Use 4 ingredients, hair will be thick and long in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.