Lokmat Sakhi >Beauty > आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत

आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत

4 natural ingredients that can be added to your bath water आंघोळ करुनही अनेकदा फ्रेश वाटत नाही, त्यावर हे खास स्वस्त-मस्त आणि उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 03:43 PM2023-05-12T15:43:05+5:302023-05-12T15:44:11+5:30

4 natural ingredients that can be added to your bath water आंघोळ करुनही अनेकदा फ्रेश वाटत नाही, त्यावर हे खास स्वस्त-मस्त आणि उत्तम उपाय

4 natural ingredients that can be added to your bath water | आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत

आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत

उन्हाळ्यात आपले शरीर तापते, कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर अंग चिपचिपित होते. ज्यामुळे अंगावर घामोळ्या, रेड रॅशेसची समस्या निर्माण होते. या कारणामुळे आपल्याला वारंवार आंघोळ करण्याची इच्छा होते. कारण आंघोळीनंतर शरीर फ्रेश तर होतेच, शिवाय बॅक्टेरिया आणि जंतूपासून मुक्ती मिळते. पण दिवसभरात आपण सतत आंघोळ तर करू शकत नाही.

सकाळी आंघोळ केल्यानंतर दुपारनंतर काहींना फ्रेश वाटत नाही. दिवसभरात ताजेतवाने व फ्रेश राहायचं असेल तर, आंघोळच्या पाण्यात या गोष्टी मिसळून आंघोळ करा. ज्यामुळे आपणास फ्रेश तर वाटेलच, यासह खाज येणे इत्यादी समस्या छळणार नाही(4 natural ingredients that can be added to your bath water).

कडुनिंब

कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिसळा. कडुलिंब किंवा त्याच्या तेलामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादी समस्येपासून आराम मिळेल. व दिवसभर फ्रेश वाटेल.

चमचाभर तांदळाचे पीठ-चमचारभर कोरफड जेल; चेहऱ्याला लावा- मिळवा चकचकीत कोरियन ब्यूटी ग्लो

हळद

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग सारखे अनेक गुणधर्म देखील असतात. ते पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास, दिवसभर फ्रेश तर वाटेलच, यासह थकवा आणि खाज सुटणे इत्यादीपासून लगेच आराम मिळेल. याशिवाय पुरळ, मुरुम, टॅनिंग यासारख्या त्वचेच्या समस्याही दूर होतील.

गुलाबाच्या पाकळ्या

स्किनसाठी गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचे पाणी फायदेशीर ठरते. आंघोळच्या पाण्यात एक किंवा ३० मिनिटांसाठी गुलाबाच्या पाकळ्या घालून ठेवा. व अर्धा तासाने या पाण्याने आंघोळ करा. गुलाबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभर फ्रेश वाटेल. यासह तुमचा मूडही दिवसभर चांगला राहील. त्वचेच्या दुर्गंधीची समस्याही दूर होईल.

पांढऱ्या केसांना डाय आणि मेहंदी लावायची गरजच नाही, २ घरगुती गोष्टी लावा-केस होतील काळेभोर

बेकिंग सोडा

आपल्या स्किनवर उन्हामुळे रेड रॅशेस किंवा इन्फेक्शन झाले असेल तर, बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. यासाठी एक कप गरम पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. अर्धा तासानंतर हे मिश्रण आंघोळच्या पाण्यात मिक्स करा. अर्धा तासानंतर बेकिंग सोड्याचं मिश्रण पाण्यात मिसळा व आंघोळ करा. याने स्किनची समस्या कमी होईल, व फ्रेश देखील वाटेल.

Web Title: 4 natural ingredients that can be added to your bath water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.