प्रत्येकाला आपली स्किन ग्लो (Glowing Skin) करावी असे वाटते. पण धूळ, माती, प्रदूषण आणि केमिकल प्रॉडक्ट्समुळे अनेकदा स्किनची समस्या वाढते. ज्यामुळे स्किनची निगा राखणं आणखी कठीण होऊन जाते. केमिकल-महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण नैसर्गिक उत्पादनांचा वापर करू शकता.
नैसर्गिक प्रॉडक्ट्समुळे (Natural skin Products) देखील स्किनवर ग्लो येऊ शकते. जर आपल्याला दिवसभराच्या धावपळीच्या रुटीनमुळे चेहऱ्याची निगा राखणं जमत नसेल तर, आपण रात्रीच्या वेळेस स्किन रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर नवी चमक आणू शकता. ४ नैसर्गिक उपायांचा नियमित वापर केल्याने आपल्या चेहऱ्यावर आलिया भटप्रमाणे (Alia Bhatt) तजेलदार चमक येईल(4 natural remedies to get a fair and glowing skin like Alia Bhatt).
झोपण्यापूर्वी या गोष्टी त्वचेवर लावायला विसरू नका
खोबरेल तेल
जर आपली स्किन खूप ड्राय असेल तर, झोपण्यापूर्वी नियमित खोबरेल तेल लावून मसाज करा. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. हिवाळ्यात स्किन ड्राय होतेच. त्यामुळे नियमित चेहऱ्यावर खोबरेल तेलाचे ४ ते ५ थेंब घेऊन चेहऱ्यावर लावा, व मसाज करा. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेवर नवी चमक येईल.
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. एलोवेरा जेल त्वचेला हायड्रेशन प्रदान करते. ज्यामुळे चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. यासह त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यासाठी नियमित त्वचेवर एलोवेरा जेल लावून मसाज करा.
कच्चे दूध
दूध चेहऱ्यावर क्लिंजर म्हणून काम करते. रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावून मसाज केल्याने टॅनिंग आणि डेड स्किन निघून जातात. त्यातील ॲण्टीऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे चेहरा ग्लो करतो. यासाठी तळहातावर २ चमचे कच्चे दूध घ्या, व चेहऱ्यावर लावून मसाज करा. किंवा कॉटन बॉल दुधात बुडवून चेहऱ्यावर लावा, नंतर सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
गुलाब जल
गुलाब जलाचा वापर अनेक प्रकारे केले जाऊ शकते. बरेच जण फेस पॅकमध्ये गुलाब जल घालून मिक्स करतात. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. आपण रात्री कापसाने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावू शकता. यामुळे नक्कीच काही दिवसात फरक दिसेल. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.