बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचा विकारांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी तर, उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याच्या समस्येमुळे बरेच जण त्रस्त आहे. पावसाळ्यात देखील स्किनवर फंगल इन्फेक्शन व टॅनिंगची समस्या वाढते.
मुख्य म्हणजे पावसाळ्यात पाय काळवंडलेले दिसतात. अशा स्थितीत लोकं ओपन फुटविअर घालणे टाळतात. हे टॅनिंग दूर करण्यासाठी महागड्या पार्लरवर खर्च करण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करून पाहा. या उपायांमुळे काही दिवसात पाय स्वच्छ - सुंदर दिसतील. यासह टॅनिंग देखील कमी होईल(4 Natural Ways To Remove Tan From Legs).
पायाचे टॅनिंग कमी करण्यासाठी काही टिप्स
दूध आणि क्रीम
पायातील काळपटपणा आपले संपूर्ण सौंदर्य बिघडवते. पाय स्वच्छ व सुंदर दिसावे म्हणून दूध आणि क्रीमचं वापर करून पाहा. दूध क्लिंजर म्हणून काम करते. ज्यामुळे टॅनिंग कमी होईल. यासाठी एका वाटीत दूध आणि मलाई घेऊन पेस्ट तयार करा, ही पेस्ट पायांना लावा, व २ तासानंतर पाय स्वच्छ धुवा.
एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर
हळद आणि बेसन
पायांची टॅनिंग कमी करण्यासाठी आपण हळद आणि बेसनाचा वापर करू शकता. या उपायामुळे टॅनिंग तर कमी होतेच पण डेड स्किनही दूर होते. यासाठी एका वाटीत बेसन, हळद आणि दही मिसळून स्क्रब तयार करा. २० मिनिटानंतर पाय पाण्याने धुवून काढा.
पपई आणि मध
पपई आणि मध देखील पायातील टॅनिंग दूर करण्यासाठी प्रभावी ठरेल. यासाठी एका वाटीत पपईचा पल्प घ्या, त्यात मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ३० मिनिटापर्यंत पायांवर लावून ठेवा, त्यानंतर पाय स्वच्छ धुवा.
चेहऱ्यावर हवाय इन्सटंट ग्लो? २ रुपयांच्या लिंबाने करा ३ फेसमास्क, पावसाळ्यात चमकेल त्वचा
टोमॅटो आणि दही
टोमॅटो आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते, ते त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. याशिवाय दह्याच्या मदतीने त्वचा एक्सफोलिएट होते. यासाठी टोमॅटोची साल काढून पेस्ट तयार करा. त्यात दही मिसळा. ही पेस्ट पायांवर लावा. ३० मिनिटानंतर पाय स्वच्छ धुवून काढा.