Lokmat Sakhi >Beauty > केस फार गळतात, स्काल्पवर बुरशी-फंगल इन्फेक्शन तर नाही? ४ घरगुती उपाय- त्रास कमी

केस फार गळतात, स्काल्पवर बुरशी-फंगल इन्फेक्शन तर नाही? ४ घरगुती उपाय- त्रास कमी

4 Simple Home Remedies For Fungal Scalp Infections! : पावसात भिजल्यानंतर स्काल्पवर नुसती खाज सुटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 10:00 AM2024-07-09T10:00:11+5:302024-07-09T10:05:02+5:30

4 Simple Home Remedies For Fungal Scalp Infections! : पावसात भिजल्यानंतर स्काल्पवर नुसती खाज सुटते?

4 Simple Home Remedies For Fungal Scalp Infections! | केस फार गळतात, स्काल्पवर बुरशी-फंगल इन्फेक्शन तर नाही? ४ घरगुती उपाय- त्रास कमी

केस फार गळतात, स्काल्पवर बुरशी-फंगल इन्फेक्शन तर नाही? ४ घरगुती उपाय- त्रास कमी

पावसाळ्यात लोकांमध्ये केस गळण्याची समस्या खूप वाढते (Fungal Infection). पावसाळ्यात तापमानातील आर्द्रतेमुळे टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्गाची समस्या सुरू होते, त्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात (Scalp Infection). स्काल्प इन्फेक्शन खाज, कोंडा, होण्याच्या तक्रारी सुरू होतात (Hair care). बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण न ठेवल्यास, टक्कल पडण्याची देखील स्थिती निर्माण होते.

केसांमध्ये बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी केमिकल उत्पादनांचा वापर टाळण्यापेक्षा घरगुती उपायांना फॉलो करा. या काही घरगुती उपायांमुळे केसांमधील संसर्ग दूर होईल आणि केस मजबूत होतील. स्काल्पवर फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून, कोणत्या घरगुती उपाय फॉलो कराव्यात? पाहूयात(4 Simple Home Remedies For Fungal Scalp Infections!).

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल बुरशीजन्य संसर्गामुळे होणारी खाज, लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करते. यासाठी स्काल्पवर एलोवेरा जेल लावा. काही वेळानंतर केस स्वच्छ शाम्पूने धुवा. एलोवेरा जेलचा नियमित वापर केल्याने बुरशीजन्य संसर्ग दूर होतो.

ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

कडूलिंब

अँटीफंगल गुणधर्मांनी परिपूर्ण कडू लिंबाची पानं केसांसाठी फायदेशीर ठरते. स्काल्प इन्फेक्शनपासून सुटका हवी असेल तर, एका बाऊलमध्ये कडू लिंबाच्या पानांची पेस्ट घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा. काही वेळानंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे इन्फेक्शन दूर होईल.

मेथी दाणे

मेथी दाणे केसांसाठी अधिक फायदेशीर ठरते. यातील गुणधर्मामुळे स्काल्प क्लिन राहते, आणि केस मजबूत होतात. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात १ चमचा मेथी पावडर घालून मिक्स करा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा. काही वेळानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा.

नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त

खोबरेल तेल

खोबरेल तेलामुळे केसांना मजबुती मिळते. यासह यात अनेक गुणधर्म असतात. जे फंगल इन्फेक्शनची समस्या दूर करतात. यासाठी स्काल्प आणि केसांना खोबरेल तेल लावून मसाज करा. यामुळे केस गळतीही थांबेल. 

Web Title: 4 Simple Home Remedies For Fungal Scalp Infections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.