Lokmat Sakhi >Beauty > वर्षाचे बाराही महिने स्किन टॅनिंगच्या समस्येने हैराण ? ४ घरगुती सोपे उपाय, त्वचा दिसेल चमकदार...

वर्षाचे बाराही महिने स्किन टॅनिंगच्या समस्येने हैराण ? ४ घरगुती सोपे उपाय, त्वचा दिसेल चमकदार...

Highly effective home remedies to remove tan : चेहरा-मान-हात काळवंडतात अशावेळी काय करावं कळत नाही? त्यासाठीच हे सोपे पण असरदार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 08:49 PM2023-07-22T20:49:10+5:302023-07-24T16:51:37+5:30

Highly effective home remedies to remove tan : चेहरा-मान-हात काळवंडतात अशावेळी काय करावं कळत नाही? त्यासाठीच हे सोपे पण असरदार उपाय

4 Simple Home Remedies For Removing Skin Tan. | वर्षाचे बाराही महिने स्किन टॅनिंगच्या समस्येने हैराण ? ४ घरगुती सोपे उपाय, त्वचा दिसेल चमकदार...

वर्षाचे बाराही महिने स्किन टॅनिंगच्या समस्येने हैराण ? ४ घरगुती सोपे उपाय, त्वचा दिसेल चमकदार...

आपल्याकडे पाऊस पडो किंवा थंडी तरीही वर्षभर आपल्याला त्वचेच्या डिटॅनची समस्या सतावत असतेच. स्किन डिटॅनिंगच्या समस्येने अनेक स्त्रिया चिंतेत असतात. भारतामध्ये कितीही गारवा निर्माण झाला तरीही स्किन डिटॅन करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. आपल्याकडे कितीही पावसाळा असला तरीही काहीवेळा पाऊस हा उशिरा सुरु होतो तोपर्यंत आपल्याला उष्णतेचा सामना करावा लागतोच. सूर्याची किरणं आपल्या स्किनच्या डायरेक्ट संपर्कात येत असल्यामुळे आपल्याला स्किनच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसतात. स्किनच्या या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण शक्यतो महागड्या क्रिम्स किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्सचा आधार घेतो. याशिवाय आपण सनस्क्रीन लोशन किंवा इतर काही घरगुती उपायांचा देखील वापर करून पाहतो. परंतु काहीवेळा या उपायांचा आपल्याला तितकासा फायदा झालेला दिसून येत नाही. 

आपली स्किन केवळ सूर्य किरणांच्याच संपर्कात आल्याने टॅन होत नाही तर, सध्याचे धुळीचे वातावरण, प्रदूषण, हवेतील आर्द्रता, वातावरणातील ओलावा यामुळे देखील ऐन पावसाळ्यात स्किन टॅनिंगची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत, आपल्या स्किनचा मूळ रंग नाहीसा होऊन स्किन हळुहळु काळी पडू लागते. यामुळे आपल्या स्किनचा रंग वेगळा व टॅन झालेल्या भागाचा रंग वेगळा दिसतो, आणि हा स्किनच्या रंगातील फरक अगदी लगेच जाणवून येतो. यासाठीच आपण घरच्या घरी काही सोपे उपाय करुन ही स्किन टॅनिंगची समस्या लगेच दूर करु शकतो(4 Simple Home Remedies For Removing Skin Tan).

दह्याचा वापर करून स्किन टॅन काढण्याचे काही सोपे उपाय... 

१. दही आणि बेसन :- चेहऱ्यावरचे टॅनिंग दूर करण्यासाठी, आपण दह्यात बेसन मिसळून लावू शकता. दोन चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळा. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. मिश्रण सुकल्यावर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेला आर्द्रताही मिळते. याचबरोबर कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

चिमूटभर हिंग आणि चेहऱ्यावर चमक ! विश्वास नसेल बसत तर लावून पाहा हिंगाचा फेसपॅक...

२. काकडी आणि गुलाब पाणी :- काकडी आणि गुलाबपाणी आपली स्किन हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार आणि टाईट दिसते. यासाठी एका भांड्यात काकडीचा रस आणि गुलाबपाण्याचे काही थेंब मिसळून एक चांगला फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. यामुळे आपल्या चेहऱ्याचे टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

३. दही व कॉफीचा फेसपॅक :- कॉफीमध्ये दही मिसळूनही आपण त्याचा फेसपॅक बनवू शकता. कॉफी त्वचेला एक्सफोलिएट करते. यामध्ये असलेले कण चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतात. धूळ, प्रदूषण, माती यामुळे खराब झालेला चेहरा स्वच्छ करण्यास मदत मिळते. एक चमचा दह्यात अर्धा चमचा कॉफी मिसळा आणि या मिश्रणाने चेहरा स्क्रब करा. ही पेस्ट काही वेळ चेहऱ्यावर तशीच राहू द्या. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. 

४. दही आणि मध :- दही आणि मधाच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील डाग दूर करू शकता. चेहऱ्यावरील त्वचेच्या खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी दही आणि मध उपयुक्त ठरते. यासाठी दोन चमचे दह्यात एक चमचा मध मिसळून फेसपॅक तयार करा. त्यानंतर या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करुन घ्या. नंतर २० मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा मुलायम होते आणि टॅनिंगची समस्या कमी होते.

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

Web Title: 4 Simple Home Remedies For Removing Skin Tan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.