लिपस्टिक हा आता बऱ्याच जणींच्या डेली मेकअपचा (how to apply lipstick properly) एक भाग झाला आहे. ज्याप्रमाणे रोज पावडर, काजळ लावल्या जातं, त्याचप्रमाणे आता रोज लिपस्टिकही लावली जाते. चांगल्या ब्रॅण्डची लिपस्टिक खरेदी केली तरी ती ओठांवर खूप वेळ टिकत नाही. आपण ऑफिसला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला लिपस्टिक (makeup tips) लावून गेल्यानंतर सुरूवातीचे २- ३ तास ती चांगली राहते, पण त्यानंतर मात्र फिकी होत जाते. मग अशा लिपस्टिकला सारखं सारखं टचअप करावं लागतं. कधी कधी टचअप (touch up to lipstick) करायला आपल्याकडे तेवढा वेळही नसतो. म्हणूनच तर लिपस्टिक छान लाँगलास्टिंग (long lasting lipstick) रहावी यासाठी या काही खास टिप्स (Proper method of applying lipstick in Marathi) फॉलो करा.
लिपस्टिक जास्त वेळ ओठांवर टिकून रहावी यासाठी.....
4 solutions for long lasting lipsticks
१. ओठ स्वच्छ अणि निरोगी असतील तर लिपस्टिक ओठांवर अधिक काळ टिकून राहते. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापुर्वी थाेडी काळजी घ्या. चणा डाळीचं किंवा मसूर डाळींच पीठओठांवर थोडेसे चोळून ओठ नीट स्वच्छ करून घ्या. अशा पद्धतीने ओठांचं छान स्क्रबिंग होईल. त्यानंतर लिपबाम लावून ओठांना व्यवस्थित मसाज करा. लिपबाम ओठांवर व्यवस्थित सेट झाल्यानंतरच लिपस्टिक लावा.
२. लिपस्टिक लावताना दोन कोट लावा. पण ते कोट लावण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जो हवा तो कोट ओठांवर लावून घ्या. यानंतर दोन्ही ओठांमध्ये टिशू पेपर ठेवा आणि दोन्ही ओठांनी त्यावर दाब द्या. यामुळे अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल. आता असं केल्यानंतर पुन्हा एकदा लिपस्टिकचा एक कोट ओठांवर द्या. असं केल्यामुळे लिपस्टिक ओठांवर व्यवस्थित सेट होते आणि अधिक काळ टिकते.
३. लिपस्टिक अधिक काळ टिकावी म्हणून ट्रान्सलुसंट पावडर किंवा फाउंडेशनचाही (foundation) वापर करता येतो. यासाठी ओठांवर आधी लिपबाम लावून मसाज करून घ्या. लिपबाम (lip bam) सेट होण्यासाठी ७ ते ८ मिनिटे जाऊ द्या. यानंतर ओठांवर बोटांनी ट्रान्सलुसंट पावडर किंवा मग फाउंडेशन याच्यापैकी काहीही लावा आणि हलक्या हाताने ओठांना मसाज करा. त्यानंतर लिपस्टिकचा शेड लावा. हा उपाय केल्यामुळे लिपस्टिक ओठांवर एकसारखी दिसते आणि अधिक काळ टिकून राहते.
४. आपण जी लिपस्टिक रोज लावतो किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्याला जी लिपस्टिक लावायची आहे, अशी लिपस्टिक कमीतकमी १० ते १२ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. फ्रिजमध्ये काही काळ ठेवलेली लिपस्टिक जर ओठांवर लावली तर ती लाँग लास्टिंग ठरते.
लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत
Proper method of applying lipstick
- जर तुमचे ओठ पातळ असतील, तर सगळ्यात आधी लीप पेन्सिलने ओठांना व्यवस्थित आकार देऊन घ्या. त्यानंतर लिपब्रशने लिपस्टिक लावा.
- काही जणींचे ओठ आकाराने खूपच बारीक असतात. ओठ भरीव दिसण्यासाठी ओठांची जी आऊटलाईन आहे, त्याच्या किंचित बाहेरून लिप लायनर लावा. यानंतर लिपब्रशच्या साहाय्याने आतल्या भागात लिपस्टिक लावा.
- लिप लायनरने आऊटलाईन काढल्यावर खालच्या आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी लिपस्टिकच्या शेडने एक उभी रेघ मारा. आता ओठांच्या दोन्ही टोकांपासून ते मधल्या लाईनपर्यंत हळूवार हाताने लिपस्टिक लावत या.
- लिपस्टिक लावण्याच्या आधी अनेक जणी ओठांवर लिपबाम लावतात. जर लिपबाम कमी किंवा जास्त झाला तरीही लिपस्टिकची शेड बदलू शकते. त्यामुळे लिपस्टिक लावण्याच्या आधी ओठांवर लिपबाम जरूर लावा, पण तो खूप जास्त नको.
- लिपबाम लावल्यानंतर दोन्ही ओठांच्यामध्ये तुमच्या हाताचे पहिले बोट आडवे घाला आणि बोटावर ओठ टेकवून लिपबाम थोडा कमी करून घ्या. त्यानंतर पाच मिनिटे जाऊ द्या आणि मग लिपस्टिक लावा.