Join us  

फक्त १ कप दही, घरच्याघरीच करा सोप्या ४ स्टेप्समध्ये पार्लरसारखे दही फेशियल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 3:17 PM

4 Steps Curd Facial For Skin Lightening : Curd Facial For Instant Bright & Glowing Skin : Curd Facial At Home : रोज दही खाण्यासोबतच हेल्दी स्कीनसाठी असा करा वापर...

रोजच्या जेवणात आपण दही आवर्जून खातोच. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. दही खाण्यासोबतच आपल्या स्किनचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये देखील आपण दह्याचा वापर करु शकता. दह्यातील पोषक तत्त्वांमुळे आपल्या त्वचेला त्याचे भरपूर फायदे मिळतात. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेवरील मृत पेशी काढून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. तसंच यातील फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजे या घटकांमुळे त्वचा निरोगी राहते(4 Steps Curd Facial For Skin Lightening).

दह्यातील (How to Get Naturally Glowing skin using curd) पोषण तत्त्वांचा त्वचेला खोलवर पुरवठा होऊन त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. दह्यासारख्या नॅचरल पदार्थाचा वापर करुन तयार केलेल्या फेशिअलमुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहऱ्याचे सौंदर्य (Curd Facial For Instant Bright & Glowing Skin) टिकवून ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. स्किन केअर रूटीनमध्ये फेस पॅकपासून ते फेस स्क्रबपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्वचेवरची घाण निघून जाते. त्वचेवरची डेड स्किन काढून टाकल्याने चेहऱ्यावर चमक येते. यासाठीच रोजच्या वापरातील कपभर दह्याचा (Curd Facial At Home) वापर करून आपण घरच्याघरीच दह्याचे फेशियल ४ सोप्या स्टेप्समध्ये करु शकतो. दह्याचे फेशियल करण्याच्या ४ सोप्या स्टेप्स कोणत्या ते पाहूयात(Must Try Curd Facial For Glowing skin).

दह्याचा वापर करुन फेशियल कसे करावे ? 

१. क्लिनिंग :- या सगळ्यांत पहिल्या स्टेपमध्ये फेशियल करण्यापूर्वी त्वचेचे क्लिनिंग करणे अतिशय महत्वाचे आहे. क्लिनिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून दही घेऊन त्यात १ टेबलस्पून गुलाबपाणी घालून मिक्स करुन घ्यावे. या मिश्रणाने चेहऱ्यावर ५ ते ७ मिनिटे मसाज करुन मग चेहरा कापसाच्या बोळ्याने स्वच्छ पुसून घ्यावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

बॉलिवूड अभिनेत्रीही आता म्हणतात हेअर ट्रिटमेंट नको, नीता अंबानींचा हेअर स्टायलिस्ट सांगतो मुख्य कारण... 

२. स्क्रबिंग :- दुसऱ्या स्टेपमध्ये, त्वचेचे क्लिनिंग झाल्यानंतर स्क्रबिंग करावे. स्क्रबिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये  १ टेबलस्पून दही घेऊन त्यात १ टेबलस्पून किसून घेतलेले बीटरुट घालावे. हे दोन्ही जिन्नस मिक्स करुन एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे तयार मिश्रण हातात घेऊन चेहऱ्याला लावून हलकेच स्क्रबिंग करून घ्यावे. किसलेल्या बीटरुटमुळे आपल्या त्वचेचे योग्य प्रकारे स्क्रबिंग करण्यास मदत होईल. हे स्क्रब वापरुन ५ ते ७ मिनिटे स्क्रब करुन घ्यावे. 

३. मसाजिंग :- या तिसऱ्या स्टेपमध्ये स्किनला मसाज करायचा आहे. मसाज करण्यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून दही घेऊन त्यात १ टेबलस्पून कॉफी पावडर घालून दोन्ही पदार्थ एकत्रित मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर या दही आणि कॉफीच्या एकत्रित मिश्रणाने आपल्या त्वचेला मसाज करुन घ्यावा. मसाज करताना हाताच्या बोटांनी त्वचेवर हलका दाब देत मसाज करावा. मसाज करताना हे मिश्रण थोडे थोडे बोटांवर लावून त्याने मसाज करावा. 

अभिनेत्री रोशनी चोप्रा सांगते, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सिक्रेट ड्रिंकची रेसिपी, स्किनवर गुलाबी ग्लो कायम...

४. फेसपॅक :- चौथ्या आणि शेवटच्या स्टेपमध्ये त्वचेला फेसपॅक लावायचा आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून दही घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून बेसन आणि आंबे हळद घालावी. हे सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे. हा फेसपॅक त्वचेला लावून किमान १० ते १५ मिनिटे किंवा फेसपॅक संपूर्णपणे सुकेपर्यंत तसाच चेहऱ्यावर लावून ठेवावा. फेसपॅक पूर्ण सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर त्वचेला मॉईश्चरायझर लावून हलकेच मसाज करून घ्यावा. 

अशाप्रकारे आपण ४ सोप्या स्टेप्समध्ये झटपट घरच्याघरीच कपभर दह्याचा वापर करुन पार्लरसारखा ग्लो मिळवून देणारे फेशियल करु शकतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी