केस गळण्याच्या त्रासामागे अनेक कारणं असू शकतात जसं की शरीरात हॉर्मोनल इम्बेलेंस असणं, शरीरात न्युट्रिशन्सची कमतरता, जास्त ताण येणं, थायरॉईड, पोस्टपार्टम हेअर लॉस आणि अनुवांशिक कारणांबरोबरच अनेक कारणांमळे केसांच्या समस्या उद्भवतात. (Super Foods For Long Hairs Suggested By Doctor) जर तुम्हाला लांब दाट केस हवे असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी आहाराकडे लक्ष द्यावं लागेल. अशा काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही केस भरपूर वाढवू शकता. डॉक्टर दीक्षा यांनी याबात अधिक माहिती दिली आहे. (Superfoods For Long And Thick Hairs)
खजूर, अंजिर, मनुके
हे तिन्ही ड्रायफ्रुट्स केसांची वाढ होण्यास मदत करतात ज्यामुळे हेअरफॉल कमी होतो, यात आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. सकाळी २ भिजवलेले खजूर, २ अंजीर आणि १ टेबलस्पून मनुके खाल्ल्यानं तुम्हाला ताकद मिळेल आणि शरीरातील आयर्न लेव्हल मेंटेन राहील. केसांच्या वाढीसाठी हे उत्तम ठरते.
अक्रोड
ट्राया. हेल्थच्या रिपोर्टनुसार अक्रोडमध्ये ओमेगा-३, ओमेगा ६ फॅट्स असतात. ज्यामुळे मेंदूचा विकास चांगला होतो. याशिवाय केसांचीही वाढ होते. यात कॉपर, फॉस्फरस, फॉलिक एसिड, व्हिटामीन ई, व्हिटामीन बी-६, मॅन्गनिझ असते त्यामुळे इम्यूनिटी वाढते. अक्रोड खाल्ल्याने केस वाढण्यास मदत होते. अक्रोड सेलेनियमचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे केस गळणं रोखता येतं. यात बायोटीन भरपूर असते ज्याच्या सेवनानं हेअर फॉलचा धोका कमी होतो.
नाचणी
नाचणी एक सुपरफुड आहे. यात आयर्न कॅल्शियम आणि फॉलेट यांसारखे न्युट्रिएंट्स असतात. हे हेअर ग्रोथसाठी फायदेशीर ठरतात. नाचणीच्या पिठापासून तुम्ही डोसा, सूप तसंच इतर काही पदार्थ बनवू शकता. याचा आहारातही समावेश करू शकता.
डाळिंब
डाळिंबात व्हिटामीन के, व्हिटामीन सी, फायबर्स, पोटॅशियम आणि प्रोटीन्स असतात ज्यामुळे शरीराला रक्त पुरवठा चांगला होतो. याशिवाय यात व्हिटामीन सी सुद्धा असते. ज्यामुळे हेअर फॉल कमी करून केस वाढवण्यास मदत होते.