चेहरा सुंदर दिसण्यासाठी नेहमी ब्यूटी पार्लर गाठण्याची गरज नसते. ब्यूटी पार्लरमधे जाऊन , पैसे खर्च करुन जे ब्यूटी इफेक्ट आपण मिळवतो ते घरच्याघरी पैसे आणि वेळ न खर्च करताही आपण मिळवू शकतो. त्यासाठी कशाचा उपयोग कसा आणि कशासाठी करायची ही माहिती फक्त हवी.
पार्लरमधे जाऊन फेशिअल करायचं म्हणजे दोन तास लागतातच. हे काम जर घरात पंधरा मिनिटात करता आलं तर.. यासाठी तीन सोपे उपाय आहेत. फक्त करायचं एवढंच की भात कुकरमधे न शिजवता बाहेर भांड्यात शिजवायचा.. तुम्ही म्हणाल हे काय फूड आणि ब्यूटीमधे क्रॉस कनेक्शन झालं की काय? तर तसं नाही. आपल्याला जे उपाय करायचे आहेत त्यासाठी भाताचं पाणी लागणार आहे. हे पाणी भात कुकरच्या बाहेर भांड्यत शिजवला तरच मिळेल ना.
Image: Google
भाताचं पाणी आणि चमकदार त्वचा
भाताचं पाणी वापरुन आपण त्वचा चमकदार आणि तेजस्वी करु शकतो. यासाठी तीन पर्याय आहेत.
1. भाताचं पाणी आणि बेसन पीठ- यासाठी भांड्यात भात शिजताना त्यातून 4चमचे पाणी एका वाटीत काढावं. ते थोडं थंड होवू द्यावं. मग या पाण्यात बेसन पीठ घालावं. हे चांगलं एकत्र करुन लेप तयार करावा. आणि चेहर्याला लावावा. लेप सुकला की हात ओलसर करुन हलका मसाज करत लेप काढावा आणि चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. या उपायानं चेहरा स्वच्छ होतो.
Image: Google
2. भाताचं पाणी आणि गुलाबपाणी- 2 चमचे भाताचं पाणी घ्यावं. थोडं थंड झालं की त्यात तेवढंच गुलाबजल घालावं. हे पाणी चेहेर्याला लावावं. एकदा लावून चेहरा सुकला की पुन्हा लावावं. असं दोन तीन वेळेस केल्यानंतर शेवटी चेहरा थंड पाण्यानं धुवावा. एकदम फेशिअल केल्यासारखं तेज चेहर्यावर येतं.
Image: Google
3. भाताचं पाणी आणि कोरफडीचा गर- 4 चमचे भाताचं पाणी घ्यावं. ते थोडं थंड झालं की त्यात 2 चमचे मुलतानी माती आणि 2 चमचे कोरफडीचा गर घालावा. सर्व साहित्य चांगलं एकजीव करुन लेप तयार करावा आणि तो संपूर्ण चेहर्याला लावावा. 15- 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.
हे तीन उपाय आलटून पालटून केल्यास चेहर्यावर ग्लो येण्यासाठी कोणतं क्रीम लोशन वापरावं हा प्रश्न सुटलाच म्हणून समजा