त्वचा सतत काही ना काही कारणांनी खराब होतंच असते. मग ते प्रदूषण असो वा विविध रसायने. ( 4 things from the kitchen will reduce blackheads instantly)त्वचेला सांभाळणे गरजेचे आहे. लहान वाटणाऱ्या या समस्या पुढे जाऊन त्वचेच्या विकारास कारणीभूत ठरतील. चेहऱ्यावर बरेचदा ब्लॅकहेड्स असतात. ते दिसताना फारच वाईट दिसतात. त्यांच्यामुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. त्याच प्रमाणे व्हाईटहेड्स देखील होतात. ( 4 things from the kitchen will reduce blackheads instantly) ते पटकन दिसून येत नाहीत. पण चेहऱ्याची वाट लागून जाते. चेहऱ्यावरील बारीक छिद्रांमध्ये ते अडकून असतात. नाकाच्या शेंड्यावर तसेच गालाजवळ जास्त प्रमाणात ब्लॅकहेड्स होतात. त्यांच्यामुळे खाज सुटते.
चेहर्यावरील छिद्रांमध्ये तेल साठते. बॅक्टेरिया अडकतो. तसेच काही मृत पेशी अडकतात. त्यांच्यावर हवेचा परिणाम होतो. मग त्यांचा रंग काळा होतो. त्यामुळे तेलकट त्वचा असल्यास ब्लॅकहेड्स जास्त होतात. ते काढण्यासाठी आपण पार्लरला जातो. पण सतत पार्लरला जाण्यापेक्षा त्यावरती घरगुती उपाय करा.
१. बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. दोन चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात दोन चमचे पाणी घाला. ती पेस्ट ब्लॅकहेड्स झालेल्या ठिकाणी लावा. २० मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. एचपी संतुलित करण्यासाठी बेकिंग सोडा मदत करतो.
२. टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर जीवनसत्त्व सी आणि जीवनसत्त्व ए असते. त्यामुळे जास्तीचे तेल काढण्यासाठी टोमॅटो गुणकारी ठरतो. चेहऱ्यावर टोमॅटोचे तिकडे चोळा नंतर तोंड धुवून टाका.
३. वाफारा
गरम पाण्याची वाफ आपण सर्दी झाल्यावर घेतो. तशीच वाफ घ्या. चेहऱ्यावरील छिद्र मोकळी होतात. त्यामध्ये अडकलेली घाण निघून जाते. वाफ घेणे हा सगळ्यात मस्त उपाय आहे. फक्त ब्लॅकहेडच नाही तर, इतरही घाण निघून जाते.
४. होममेड पॅक
१ चमचा लिंबू, १चमचा मध आणि १ चमचा साखरेचा पॅक तयार करा. आणि ज्या जागेवर ब्लॅकहेड्स आहेत तेथे लावा. चेहरा स्क्रब करा.
सतत चेहरा धूत राहा. असं केल्याने चेहरा तेलकट होणार नाही. तेलकट झाला नाही तर ब्लॅकहेड्स होणारंच नाहीत.