Join us  

थंडीत ओठ कोरडे पडल्याने लिपस्टीक लावता येत नाही? ४ सोपे उपाय, ओठ राहतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 3:19 PM

4 Tips for Applying Lipstick on Dry Lips In Winter : लिपस्टीक लावताना काही सोप्या गोष्टी केल्यास ओठ फुटलेले आणि कोरडे दिसत नाहीत.

ठळक मुद्देओठांना केवळ खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब घेऊन त्याने मसाज  केला तर ओठांचे मॉईश्चर टिकून राहते.कोरड्या ओठांवर लिपस्टीक नीट बसत तर नाहीच, पण त्यामुळे ओठ आणखी खराब होतात, अशावेळी काय करावे याविषयी..

लिपस्टीक ही आपल्या आवरण्याच्या गोष्टींमधील एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. लिपस्टीकशिवाय आपला मेकअप पूर्णच होऊ शकत नाही. एरवी आपण चेहऱ्याला काहीच नाही लावले तरी चालते पण लिपस्टीक आपण आवर्जून लावतोच लावतो. मात्र थंडीच्या दिवसांत ओठ खूप कोरडे पडल्याने लिपस्टीक कशी लावायची असा प्रश्न आपल्यासमोर पडतो. आपण लिपस्टीक लावली तरी थोड्या वेळाने ओठ पुन्हा कोरडे पडतात आणि त्याची सालपटे दिसायला लागतात. अशावेळी काय करायचं ते आपल्याला सुचत नाही. बाहेर जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावताना चांगलं तर दिसायचं आहे, अशावेळी लिपस्टीक लावताना काही सोप्या गोष्टी केल्यास ओठ फुटलेले आणि कोरडे दिसत नाहीत. पाहूयात या सोप्या टिप्स कोणत्या आणि त्या कशा फॉलो करायच्या (4 Tips for Applying Lipstick on Dry Lips In Winter)....

(Image : Google)

१. सामान्य लिपस्टीकमध्ये एका ठराविक प्रमाणातच मॉईश्चरायजिंग घटक असतात. मात्र जास्त प्रमाणात मॉईश्चरायजिंग घटक असलेल्या लिपस्टीक बाजारात उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत वापरण्यासाठी अशाप्रकारच्या वेगळ्या लिपस्टीक आपण खरेदी करु शकतो, त्यामुळे थंडीत ओठ कोरडे पडत असले तरी आपण लिपस्टीक लावू शकतो. 

२. लिपस्टिक मॅट असो की ग्लॉसी.. ती लावण्याआधी ओठांन लिप बाम लावावा. लिप बाममुळे ओठांची त्वचा ओलसर राहण्यास मदत होते. त्यावर लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे पडून फाटत नाही. शिवाय लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम लावला तर ओठ चमकदार दिसण्यासही मदत होते.

३. दिवसभर लिपस्टीक लावण्याची सवय असेल तर त्यातील रासायनिक घटकांमुळे ओठ जास्त कोरडे आणि काळे पडण्याची शक्यता असते. अशावेळी रोज रात्री झोपण्याआधी ओठांना थोडी साय किंवा तूप चोळावे. किमान एक तासभर हे तसेच राहू द्यावे. झोपण्याआधी ओठ पाण्याने स्वच्छ करावेत. यामुळे ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी होण्यास मदत होते.

(Image : Google)

४. झोपताना ओठांना बदाम तेल किंवा ऑर्गन तेलाचे थेंब लावल्यासही त्याचा चांगला फायदा होतो. रोज रात्री मसाज केला तरी ओठांची त्वचा चांगली राहाते. ओठांना केवळ खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब घेऊन त्याने मसाज  केला तर ओठांचे मॉईश्चर टिकून राहते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीओठांची काळजीथंडीत त्वचेची काळजी