Join us

थंडीत त्वचेवर हवा गुलाबी ग्लो? महागडे उपाय कशाला, फक्त ४ प्रकारे बिट लावा, पाहा जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 19:26 IST

4 Ways Beetroot Can Benefit Your Skin : 4 Ways In Which Beetroot Is Beneficial For Our Skin Health : Benefits Of Beetroot For Skin & How To Use Beetroot In Skincare : How to use beetroot for your skin : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या बीटरुटचा वापर करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता...

थंडीच्या दिवसांत बाजारांत लाल चुटुक बीटरुट मोठ्या प्रमाणावर विकायला येतात. आपल्या रोजच्या आहारात बीटाचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करतो. हे लालचुटुक बीटरुट खाण्यासोबतच (4 Ways Beetroot Can Benefit Your Skin) हिवाळ्यात त्वचेची आणि ओठांची काळजी घेण्यासाठी देखील फायदेशीर ठरु शकते. त्वचेच्या अनेक लहान मोठ्या समस्या दूर होऊन त्वचेवर मस्त गुलाबी ग्लो यावा यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिटमेंट्स आणि महागडे (4 Ways In Which Beetroot Is Beneficial For Our Skin Health) उपाय करतो. परंतु जर चेहऱ्यावर आर्टिफिशियल ग्लो आणण्यापेक्षा कायमचा नैसर्गिक ग्लो हवा असेल तर आपण बीटरूटचा नक्की वापर करु शकता(How to use beetroot for your skin).

त्वचा ग्लोइंग आणि सुंदर दिसावी म्हणून बीटरूटचा वापर करताना आपण अनेक पद्धतींनी त्याचा वापर करु शकतो. फक्त त्वचाच नाही तर केस, ओठ यांचे देखील नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी आपण बीटाचा (Benefits Of Beetroot For Skin & How To Use Beetroot In Skincare) वापर करु शकतो. चेहऱ्यावर जर इन्स्टंट गुलाबी ग्लो हवा असेल तर कोणतेही आर्टिफिशियल प्रॉडक्ट्स न वापरता सरळ बीटरूटचा वापर करून पाहावा. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या बीटरुटचा वापर करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. यासाठी बीटरूटचा वापर नेमका कोणकोणत्या पद्धतीने करावा ते पाहूयात. 

त्वेचेचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी बीटरूटचा वापर कसा करावा ? 

१. बीटरुटचा ज्यूस :- सुंदर त्वचेसासाठी बीटरूटचा वापर ते त्वचेवर लावण्यासोबतच त्याचा ज्यूस पिणे देखील तितकेच महत्वाचे असते. बीटरुटचा ज्यूस प्यायल्याने आपली त्वचा आतून देखील सुंदर होण्यास मदत केली जाते. यासाठी बीटरूटचा वापर करताना सर्वात आधी बीटरूटचा ज्यूस पिणे आरोग्याच्या आणि त्वचेच्या सौंदर्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. यासाठी बीटरुटचा ज्यूस करताना सर्वात आधी मिक्सरच्या भांडयात बीटरुटचे लहान लहान तुकडे करून घालावेत, त्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार आवळा, पाणी आणि आल्याचा लहानसा तुकडा व चवीनुसार मीठ घालावे. हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घेऊन मग गाळणीने गाळून हा तयार ज्यूस प्यावा. लोह आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध त्वचेसाठी बीटरूटचे बरेच फायदे आहेत. हे अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे त्याला अँटी-एजिंग एजंट बनवते. यामुळे त्वचेचे डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचेला चमक मिळते. 

मध -साखर नको, फक्त वाटीभर लिंबाचा रस वापरुन घरच्याघरी वॅक्सिंग करण्याची नवी पद्धत...

२. बीटरूट पावडर :- बीटरुटची पावडर तयार करण्यासाठी सर्वात आधी बीटरुटचे लहान लहान तुकडे घालून  ते वाटून त्याचा रस काढून घ्यावा. मग गाळणीच्या मदतीने हा रस गाळून घ्यावा. रस गाळून घेतल्यानंतर बीटाचा चोथा उरतो. हा उरलेला चोथा एका डिशमध्ये पसरवून उन्हात ३ ते ४ दिवस संपूर्ण सुकेपर्यंत वाळू द्यावा. या चोथ्यामधील पाण्याचा अंश संपूर्णपणे नाहीसा झाल्यानंतर हा वाळका चोथा मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर आपण काचेच्या बरणीत वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती फेसमास्क तयार करताना आपण त्यात ही बीटरुटरची पावडर घालून त्याचा वापर त्वचेसाठी करु शकतो. 

३. बीटरूट लीप स्क्रब :- त्वचेसोबतच ओठांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी देखील आपण बीटरूटचा वापर करू शकतो. यासाठी ताजे, फ्रेश बीटरूट किसून मिक्सरमध्ये घालून हलकेच जाडसर वाटून घ्यावे. त्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले बीटरूट एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. मग यात साखरेची जाडसर वाटून घेतलेली भरड घालावी याचबरोबर एक व्हिटॅमिन 'ई' ची कॅप्सूल फोडून घालावी. असे सगळे जिन्नस एकजीव करून एका काचेच्या डबीत स्टोअर करून ठेवावे. असा लीप स्क्रब आपण आठवड्यातून दोन वेळा ओठांवर लावून मसाज करु शकता. यामुळे थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची समस्या दूर होते. तसेच यामुळे ओठांची त्वचा मऊमुलायम होऊन ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येतो.    

कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....

४. बीटरूट फेसमास्क आणि स्क्रब :- बीटरुट पासून फेसमास्क आणि स्क्रब तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये तांदुळाचे पीठ, दही, बीटरूटचा रस असे सगळे जिन्नस एकत्रित मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता ही तयार पेस्ट चेहऱ्याच्या त्वचेला लावून घ्या. त्यानंतर जेव्हा हे चेहऱ्यावरचा हा फेसमास्क हलकासा वाळेल तेव्हा हलक्या हाताने मसाज करून त्वचेचे स्क्रबिंग करून घ्यावे. अशाप्रकारे आपण बीटरूटचा वापर करून त्वचेसाठी  फेसमास्क आणि स्क्रब तयार करु शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी