हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे हे फार कॉमन आहे. त्वचेला आलेल्या कोरडेपणामुळे त्वेचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या पडतात. यामुळे हिवाळ्यात आपली त्वचा अधिकच रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. हिवाळ्यात त्वचेला येणारा कोरडेपणा घालवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या क्रिम्स, लोशन, मॉइश्चरायझर वापरतो. परंतु या महागड्या क्रिम्सचा प्रभाव त्वचेवर फक्त काही काळापुरताच टिकून राहतो. या क्रिम्सचा प्रभाव संपला की परत थोड्या वेळानंतर आपली स्किन कोरडी पडू लागते. यासाठी कोणत्याही महागड्या क्रिमपेक्षा त्वचेसाठी तुपाचा वापर करु शकता. कोरड्या त्वचेवर तूप लावले तर ते अनेक प्रकारे त्वचेला फायदेशीर ठरते(How To Use Ghee For Skincare In Winter).
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे यांसारख्या अनेक समस्यांवर (How To Use Ghee For Skincare In Winter For Wrinkle Free Face) तूप लावणे हा एक उत्तम उपाय आहे. हिवाळ्यात वातावरणातील थंड हवा त्वेचेचा ओलावा शोषून घेते. यासाठी त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी तूप वापरणे अधिक चांगले. हिवाळ्यात तूप त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. हिवाळ्यात त्वचेला तूप लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी कोरड्या त्वचेवर तुपाचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात(4 Ways To Add Ghee Into Your Skincare Routine During Winters).
हिवाळ्यात त्वेचेसाठी तुपाचा असा वापर करा...
१. तूप आणि मध :- हिवाळ्यात कोरड्या त्वेचेसाठी तूप आणि मधाचा वापर करणे फायदेशीर ठरते. यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून तूप घेऊन त्यात १/२ टेबलस्पून मध घालावे. आता हे दोन्ही जिन्नस एकत्रित मिक्स करून घ्यावे. तूप आणि मधाचे एकत्रित मिश्रण त्वेचेवर लावून १५ मिनिटे तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे त्वचेला आलेला कोरडेपणा आणि त्वेचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, त्वचा कोरडी रखरखीत होण्याचा धोका टाळा...
२. तूप आणि बेसन :- तूप आणि बेसन वापरून आपण हिवाळ्यात त्वचेला आलेला कोरडेपणा अगदी सहजपणे घालवू शकतो. यासाठी १ टेबलस्पून बेसनात प्रत्येकी २ टेबलस्पून तूप व दूध घालून मिक्स करून घ्यावे. तूप, दूध आणि बेसनाचा फेसपॅक कोरड्या त्वचेवर लावून हलकेच मसाज करून घ्यावा. १० ते १५ मिनिटे हा फेसपॅक त्वचेवर तसाच लावून ठेवावा. हा फेसपॅक सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे त्वचेवरील रिंकल्स, बारीक रेषा, सुरकुत्या कमी होतात.
३. तूप आणि मुलतानी माती :- एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून मुलतानी माती, २ टेबलस्पून तूप आणि गरजेनुसार गुलाबपाणी मिसळून त्याची पातळ पेस्ट तयार करून घ्यावी. हा तयार फेसपॅक त्वचेवर लावून २० मिनिटे तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. तूप आणि मुलतानी माती यामुळे थंडीत कोरडी पडलेली त्वचा आणि त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या हळूहळू कमी होऊन निघून जातात.
मेकअपचे ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापरा घरगुती ४ पदार्थ, ब्रश राहतील मऊ- महागड्या क्लिनरची गरज नाही...
४. तूप आणि एलोवेरा जेल :- तूप आणि एलोवेरा जेल वापरुन हिवाळ्यात कोरडी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी मऊ, मुलायम करु शकतो. यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून तूप घेऊन त्यात फ्रेश एलोवेरा जेल मिक्स करून घ्यावे. हा फेसपॅक त्वचेवर लावून हलकेच मसाज करून घ्यावा. तूप आणि एलोवेरा जेल यांचा एकत्रित फेसपॅक त्वचेवर लावल्याने हिवाळ्यात त्वचा हायड्रेटेड राहते.
ऐन हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण महागड्या क्रिम्सचा पेक्षा तुपाचा वापर करु शकता.