Lokmat Sakhi >Beauty > रोज गळून केस पातळ-कमजोर झाले? अर्धा कांदा 'या' पद्धतीने केसांना लावा, दाट होतील केस

रोज गळून केस पातळ-कमजोर झाले? अर्धा कांदा 'या' पद्धतीने केसांना लावा, दाट होतील केस

4 Ways To Apply Onion Juice On Scalp Home Made : कांद्याचा रस केसांची वाढ करतो. घरच्याघरी तुम्ही कांद्याचा शॅम्पू वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:07 PM2024-07-18T16:07:09+5:302024-07-18T16:45:29+5:30

4 Ways To Apply Onion Juice On Scalp Home Made : कांद्याचा रस केसांची वाढ करतो. घरच्याघरी तुम्ही कांद्याचा शॅम्पू वापरू शकता.

4 Ways To Apply Onion Juice On Scalp Home Made Onion Shampoo Hair Growth Hair Fall | रोज गळून केस पातळ-कमजोर झाले? अर्धा कांदा 'या' पद्धतीने केसांना लावा, दाट होतील केस

रोज गळून केस पातळ-कमजोर झाले? अर्धा कांदा 'या' पद्धतीने केसांना लावा, दाट होतील केस

केस गळतीचा त्रास कमी करण्यासाठी मुली बरेच घरगुती उपाय करतात. तर काहीजणी नियमित पार्लर ट्रिटमेंट्स घेतात. कांदा त्याच्या तीव्र वासासाठी ओळखला जातो.  कांद्याचा वापर फक्त स्वयंपाकात नाही तर इतर  गोष्टींसाठीही केला जातो. कांद्यात सूजविरोधी आणि रोगाणूविरोधी गुण असतात. ज्यामुळे केस वाढवण्यास मदत होते. (Hair Growth Tips) कांद्याचा वापर पूर्वार नैसर्गिक उत्पादनांमध्ये केला जात आहे.  (Home Made Onion Shampoo)

जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी एंड थेरेप्युटिक्समध्ये प्रकाशित केलेल्या २०१८ च्या अभ्यासानुसार केसांच्या विकासात कांदा फायदेशीर ठरतो. (Ref) कांद्याचा रस केसांची वाढ करतो. घरच्याघरी तुम्ही कांद्याचा शॅम्पू वापरू शकता. (4 Ways To Apply Onion Juice On Scalp Home Made Onion Shampoo Hair Growth Hair Fall) बाहेरून कांद्याचे प्रोडक्ट्स आणण्यापेक्षा घरच्याघरी फ्रेश शॅम्पू किंवा हेअर सिरम तयार करणं खूपच सोपं आहे. 

कांद्याचा शॅम्पू कसा वापरायचा (How to Make  Onion Shampoo)

१०० ग्राम कांदा घ्या, नंतर कांदा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर कापलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. नंतर एका कॉटनच्या कापडात कांद्याचा अर्क गाळून घ्या. नंतर हा अर्क नारळाचे तेल, एरंडेल तेल किंवा निलगिरीच्या तेलाबरोबर शॅम्पूसोबत मिक्स करून लावू शकता.  हा हेअर मास्क केसांना अप्लाय केल्यानं हेअर वॉश करा.

केसांना कांद्याचा रस कसा लावावा (How to Apply Onion On Hairs)

२ मोठे चमचे कांद्याचा रस आणि अर्धा चमचा मध, १ छोटा चमचा ऑलिव्ह ऑईव, ३ छोटे चमचे कांद्याचा रस, ३ मोठे चमचे कांद्याचा रस ५ छोटे चमचे नारळाचं तेल आणि १ छोटा चमचा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण तुम्ही तुमच्या स्काल्पवर लावू शकता. जवळपास २० ते ३० मिनिटांनी माईल्ड शॅम्पूने केस धुवा.

प्रत्येक बायकोनं नवऱ्याला न सांगतात करावी १ गोष्ट; सुधा मूर्ती सांगतात सुखी संसाराचं सोपं गणित

कांद्याचा शॅम्पू केसांना लावण्याचे फायदे (Onion Benefits Of Hairs)

कांद्याचा रस केसांना लावल्याने रोमछिद्रांना जास्त पोषक तत्व आणि पोषण मिळते. केस कोरडे होत नाहीत आणि स्काल्प मॉईश्चराईज राहतो. केसांच्या विकासास मदत होते. कांद्यात असे अनेक गुण असतात ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते.

उदा. फ्लेवोनोइड्स आणि कॅम्पेफेरॉल आणि क्वेरसेटिन यात असते. यात सूजविरोधी, एंटी ऑक्सिडेंट् आणि वसोडिलेटरी गुण असतात. ज्यामुळे स्काल्पमध्ये रक्तप्रवाह वाढतो. कांद्यातील सूजविरोझी गुणांमुळे डोकं शांत राहण्यास मदत होते. केसांच वाढ भराभर होते.

Web Title: 4 Ways To Apply Onion Juice On Scalp Home Made Onion Shampoo Hair Growth Hair Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.