Lokmat Sakhi >Beauty > पावसाळ्यात वाढतो व्हाईट हेड्सचा त्रास, करा ४ घरगुती उपाय; चेहरा दिसेल स्वच्छ- उजळ

पावसाळ्यात वाढतो व्हाईट हेड्सचा त्रास, करा ४ घरगुती उपाय; चेहरा दिसेल स्वच्छ- उजळ

How to Get Rid of Whiteheads: चेहऱ्यावर मधून मधून दिसणारे व्हाईट हेड्स् (whiteheads) म्हणजे एक मोठी डोकेदुखी. पावसाळ्यात तर हा त्रास जरा जास्तच वाढलेला दिसतो. म्हणूनच व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी करून बघा हे काही सोपे घरगुती उपाय. (home remedies for white heads)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 05:18 PM2022-06-27T17:18:13+5:302022-06-27T17:18:47+5:30

How to Get Rid of Whiteheads: चेहऱ्यावर मधून मधून दिसणारे व्हाईट हेड्स् (whiteheads) म्हणजे एक मोठी डोकेदुखी. पावसाळ्यात तर हा त्रास जरा जास्तच वाढलेला दिसतो. म्हणूनच व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी करून बघा हे काही सोपे घरगुती उपाय. (home remedies for white heads)

4 Ways to get rid of whiteheads, How to remove whiteheads at home? Home remedies to clean whiteheads on face | पावसाळ्यात वाढतो व्हाईट हेड्सचा त्रास, करा ४ घरगुती उपाय; चेहरा दिसेल स्वच्छ- उजळ

पावसाळ्यात वाढतो व्हाईट हेड्सचा त्रास, करा ४ घरगुती उपाय; चेहरा दिसेल स्वच्छ- उजळ

Highlightsतुमच्या सौंदर्याला मारक ठरणारे व्हाईट हेड्स काढून टाकायचे असतील, तर काही घरगुती उपाय करून बघा.

पावसाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावरील व्हाईट हेड्सचे (how to get rid of white heads) प्रमाण वाढलेले जाणवते. अगदी नाकावरच नाही तर हनुवटीच्या जवळ, ओठांच्या आजुबाजुला आणि अनेक जणींना तर अगदी कपाळावरही काही ठिकाणी व्हाईट हेड्स (white heads on face) दिसू लागतात. यामुळे मग चेहरा खूपच खराब दिसू लागतो. अगदी कितीही मेकअप केला तरीही हे व्हाईट हेड्स (how to remove whiteheads) चेहऱ्यावर अगदी ठळक उठून दिसतात. त्यांना लपवून ठेवणं अशक्य होतं. म्हणूनच तर तुमच्या सौंदर्याला मारक ठरणारे व्हाईट हेड्स काढून टाकायचे असतील, तर काही घरगुती उपाय करून बघा. चेहरा होईल एकदम स्वच्छ- सुंदर आणि उजळ. 

 

चेहऱ्यावर व्हाईट हेड्स का येतात?
काही कॉस्मेटिक्सचा वापर, प्रदुषणामुळे चेहऱ्यावर बसणारी घाण, धूळ यांचे कण त्वचेतील तेलात मिसळले जातात आणि त्वचेवरील छिद्रांमध्ये किंवा हेअर फॉलिक्समध्ये अडकून बसतात. त्यामुळे त्वचेवरील रंध्रे किंवा पोअर्स बंद होतात. काही दिवसांनी त्या जागी पांढऱ्या रंगाचे फुगवटे दिसू लागतात. त्यालाच आपण व्हाईट हेड्स किंवा मग हिंदीमध्ये सफेद फुंसी म्हणतो. धूळ, बॅक्टेरिया आणि चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल हे प्रामुख्याने व्हाईट हेड्स येण्यासाठी कारणीभूत आहेत.

 

व्हाईट हेड्ससोबत असं चुकूनही करू नका..
अनेक जणींची एक सवय असते. त्वचेवर व्हाईट हेड्स दिसू लागले की नखाने, एखाद्या टोकदार वस्तूने किंवा मग खडबडीत कपड्याने त्यावर जोरजाेरात चोळायचं आणि व्हाईट हेड्स काढून टाकायचे. पण यामुळे एका ठिकाणचं इन्फेक्शन अन्य ठिकाणीही पसरतं आणि त्यामुळे मग तो त्रास वाढत जातो. त्यामुळे असा प्रयत्न करू नका.

 

व्हाईट हेड्स काढून टाकण्याचे उपाय 
१. सगळ्यात आधी चेहऱ्याला काही मिनिटे गरम पाण्याची वाफ द्या. यानंतर टी ट्री ऑईलचे एक- दोन थेंब, १ टेबलस्पून मध आणि हरबरा डाळीचे पीठ एकत्र करा आणि त्या स्क्रबने चेहऱ्याला मसाज करा. काही वेळ स्क्रब चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि नंतर चोळून चोळून थंड पाण्याने धुवून टाका.
२. आता दुसरा उपाय करण्यासाठी गव्हाचं पीठ, चिमुटभर हळद आणि कोरफडीचा गर वापरावा. यासाठी सगळ्यात आधी चेहऱ्याला काही मिनिटे वाफ द्या. त्यानंतर या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचा स्क्रब तयार करा. हा स्क्रब ओल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर उलट दिशेने चोळा. ७ ते १० मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा धुवून टाका. 


३. कॉर्नस्टार्च आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस यांचा वापर करूनही चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स काढून टाकता येतात. यासाठी १ टीस्पून कॉर्नस्टार्च आणि १ टीस्पून व्हिनेगर एकत्र करा. व्हिनेगर नसल्यास लिंबाचा रस वापरू शकता. चेहरा धुवून घ्या. त्यानंतर ज्याठिकाणी व्हाईट हेड्स आहेत, त्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि हलक्या हाताने एक- दोन मिनिटे मसाज करा. त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 
४. मुलतानी माती आणि गुलाबपाणी हे मिश्रणदेखील व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी राहू द्यावा. 
 

Web Title: 4 Ways to get rid of whiteheads, How to remove whiteheads at home? Home remedies to clean whiteheads on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.