Join us  

वर्कआऊटनंतर घामाने केस चिपचिपे होतात ? ४ सोपे पर्याय, केसांचे आरोग्य राहील उत्तम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 6:34 PM

Greasy Hair After A Workout ? Follow This Hair Care Routine : वर्कआऊटनंतर केल्यानंतर केस घामाने खूपच चिकट होतात, म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स...

सध्याच्या काळात फिट राहण्यासाठीच सगळेच जिम, योगा किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटीज करण्याला जास्त प्राधान्य देतात. या अ‍ॅक्टिव्हिटीज करताना आपल्याला प्रचंड प्रमाणात घाम येतो. जसजसे आपण अ‍ॅक्टिव्हिटीज जास्त करतो तसा शरीराला जास्त घाम येतो. व्यायाम करताना शक्यतो आपल्याला केसांपासून ते पायापर्यंत सर्वांगाला घाम येतोच. हा घाम कितीही पुसला तरीही आपले संपूर्ण शरीर हे घामाने चिकट होऊन जाते. व्यायाम करून झाल्यानंतर आपण स्वच्छ आंघोळ करून फ्रेश होतो, तेव्हा आपले घामाने भिजलेलं शरीर तर स्वच्छ होते परंतु केसांचे काय करावे हा प्रश्न पडतो. केस आपण रोज धुवू शकत नाही. मग केसांमध्ये आलेला घाम नेमका कोणत्या पद्धतीने स्वच्छ करावा असा प्रश्न पडतो. 

व्यायाम केल्यानंतर जितके शरीर घामाने भिजते तितकेच केस देखील भिजतात. परंतु या घामाने भिजलेल्या केसांची योग्य ती काळजी घेतली नाही तर केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केसांमध्ये आलेला घाम वेळीच स्वच्छ केला नाही तर केसांचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. वर्कआऊट केल्यानंतर  येणाऱ्या घामामुळे आपल्या स्कॅल्पमधील छिद्रांमध्ये घाण साचते. ही घाण त्या छिद्रांमध्ये तशीच अडकून राहते त्यामुळे केसांना आवश्यक असणारे पोषण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे आपले केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात त्याचबरोबर केसांतील कोंड्याची व इतर समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे वर्कआऊट झाल्यानंतर केसांची योग्य ती काळजी घेणे देखील अतिशय महत्वाचे असते(4 ways to keep your hair grease-free and healthy if you work out every day).

वर्कआऊट नंतर घामाने भिजलेल्या केसांची कशी काळजी घ्यावी ? 

१.  ओले केस पूर्णपणे कोरडे होऊ द्या :- भरपूर वर्कआऊट केल्यानंतर येणाऱ्या घामाने केस संपूर्ण भिजतात. अशावेळी केस गच्च बांधून ठेवण्याची चूक करू नये. केस सर्वप्रथम मोकळे सोडा व ते नैसर्गिकरित्या संपूर्ण कोरडे करून घ्यावेत. परंतु घाम सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा चुकूनही वापर करू नका. 

तुम्ही हमखास ५ चुका करता, म्हणून तर तुमचे केस गळतात! महागडी प्रॉडक्ट्स वापरुन मग काय उपयोग...

२. शॅम्पू आणि कंडिशनरचा योग्य वापर :- केस धुणे हे वर्कआऊटनंतर आंघोळ करण्याइतकेच महत्वाचे आहे. त्यामुळे वर्कआऊट नंतर केस धुण्यास विसरू नका. घामामुळे केसांमध्ये धूळ आणि घाण चिकटलेली असते, त्यामुळे केस धुणे अत्यंत आवश्यक असते. घामामुळे केस कमजोर होऊन तुटण्याची भीती असते. केस तुटू नये म्हणून योग्य प्रमाणात कंडिशनरचा वापर करून केसांना कंडिशनिंग करून घ्यावे. केस संपूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी दोन वेळा केस धुवा. केस पूर्ण धुवून स्वच्छ झाल्यानंतर त्यांना ३ ते ५ मिनिटे कंडिशनर लावून ठेवावे. 

मेहेंदी लावूनही पिकलेल्या केसांना हवा तसा रंग येत नाही ? जावेद हबीब सांगतात मेहेंदी लावण्याचे १ खास सिक्रेट...

३. कोमट पाणी वापरा :- वर्कआऊट नंतर केसांत आलेला घाम काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. केस धुण्यासाठी जास्त गरम किंवा थंड पाण्याचा वापर करू नये. यामुळे केसांच्या मुळांना इजा होऊन केस तुटू शकतात. तसेच केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर केल्याने केसांत आलेला घाम सहजरित्या काढता येतो. गरम पाण्यामुळे केसांचे नैसर्गिक ऑईल कमी होते आणि केस कोरडे होतात. त्यामुळे केस धुण्याकरता कोमट पाण्याचा वापर करावा. 

४. केस धुतल्यानंतर मोकळे सोडा :- वर्कआऊट नंतर केसातील घाम, केस स्वच्छ धुवून काढून टाकल्यानंतर केस सुकण्यासाठी तसेच मोकळे सोडून द्यावेत. यामुळे केसांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यास अधिक वेळ मिळतो. त्यामुळे केसांचे सौंदर्य राखले जाते. ब्लो ड्रायर वापरल्याने केस जलद कोरडे होतील, परंतु त्यामुळे कोरडेपणा वाढू शकतो. केस धुतल्यानंतर भिजलेले केस मोकळे ठेवणे योग्य आहे. कारण केस मोकळे ठेवल्यामुळे केस लवकर सुकतात. केसांमध्ये ओलावा राहत नाही. त्यामुळे केस मोकळे ठेवा.

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स