केस (Hair Care Tips) हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. थोडीशी निष्काळजी केस गळती, केसात कोंडा, केस कोरडे होणे यासह इतर समस्या यामुळे उद्भवू शकतात. अशा स्थितीत केसांची कायम निगा राखणं गरजेचं आहे. बरेच तज्ज्ञ रात्रीच्या वेळेस केसांची निगा राखण्यास सल्ला देतात.
रात्री घडणाऱ्या चुकांमुळे केसांचे अधिक नुकसान होते. छोट्याश्या चुकांमुळे केस गळणे (Hair Fall), तुटणे, कोंडा निर्माण होणे, यासह इतर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस केसांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेस केसांच्या निगडीत कोणत्या चुका टाळायला हव्या? केसांची निगा कशी राखावी? केसांची काळजी घेताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? रात्रीच्या वेळेस या पद्धतीने काळजी घेतल्यास केसांची समस्या सुटतील का? पाहूयात(4 Ways to Prevent Hair Loss While Sleeping).
झोपण्यापूर्वी केस विंचरून झोपा
बरेच जण दिवसातून एकदाच केस विंचरतात. दिवसभर केस असेच सोडतात, त्यामुळे केसांमध्ये गुंतता निर्माण होते. केसांचा गुंता सोडवताना ते अधिक गळतात. केसांची मुळं सैल होतात. त्यामुळे बाहेर जाताना केस नेहमी बांधून घ्या. शिवाय बाहेरून आल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी केस विंचरून झोपा. यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. शिवाय केस गळतीही होत नाही.
चेहऱ्यावर खूप केस आहेत? करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा १ सोपा उपाय, काही मिनिटांत त्वचा उजळेल
केस मोकळे सोडून झोपा
काही महिला केस बांधून, वेणी किंवा अंबाड्यात बांधून झोपतात. पण झोपताना केस खेचले जातात, ज्यामुळे केस कमकुवत होतात. अशा स्थितीत नेहमी केस विंचरून मोकळे सोडून झोपा. यामुळे केस गळणार नाही.
सिल्क किंवा सॅटिनच्या उशीवर झोपा
काहींना उशीशिवाय झोप लागत नाही. काही जण उशीवर कॉटनचे कव्हर लावतात. पण उशीवर कॉटनचे कव्हर लावून झोपू नका. यामुळे केस गळू शकतात. त्यामुळे उशीवर स्लिक किंवा सॅटिनच्या कापडाचे कव्हर लावून झोपा. यामुळे केसांचा पोत चांगला राहील, शिवाय केसांमध्ये गुंता तयार होत नाही.
न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल
ओले केस ठेऊन झोपू नका
काही जण रात्रीच्या वेळेस झोपताना आंघोळ करून झोपतात. पण केस ओले असताना झोपू नये. कारण ओले केस घेऊन झोपल्याने डोके थंड होते, ज्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय केस कमजोर होतात. त्यामुळे केस पूर्णपणे कोरडे करून झोपा.